ETV Bharat / bharat

Jammu Earthquake : जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, जीवितसह वित्तहानी नाही

चार दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये आलेल्या भूकंपानंतर आज सकाळी जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे आत्तापर्यत कुठलेही नुकसान झाले नाही.

Earthquake
भूकंप
author img

By

Published : Feb 17, 2023, 8:18 AM IST

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे आज पहाटे 5 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 3.6 इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपाचे केंद्र कटरा पासून 97 किमी अंतरावर आहे. भूकंपामुळे कुठलीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज पहाटे 5.15 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू 33.10 अक्षांश आणि 75.97 रेखांश होता. भूकंपाच्या धक्क्यांनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चार दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये भूकंप : 13 फेब्रुवारील पहाटे सिक्कीममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.3 मोजण्यात आली होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सिक्कीमच्या उत्तरेला 70 किमी अंतरावर असलेल्या युकसोम येथे पहाटे 4.15 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 27.81 आणि रेखांश 87.71 येथे होता.

देशाची पाच भूकंप झोनमध्ये विभागणी : भारतीय मानक ब्युरोने संपूर्ण देशाची पाच भूकंप झोनमध्ये विभागणी केली आहे. या झोनपैकी पाचवा झोन सर्वात धोकादायक झोन आहे. या झोनमध्ये भूकंपामुळे विध्वंस होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. देशाचा एकूण 11 टक्के भाग पाचव्या झोनमध्ये येतो. या झोनमध्ये जम्मू-काश्मीर आणि काश्मीर खोरे येतात. तसेच या झोनमध्ये हिमाचल, उत्तराखंड, गुजरात, बिहार आणि ईशान्येकडील सर्व राज्ये समाविष्ट आहेत.

का होतात भूकंप : जमिनीत खूप खोलीवर टेक्टोनिक प्लेट्स असतात. त्यांची हालचाल, एकमेकांवर आदळणे आणि चढ-उतार यामुळे प्लेट्समध्ये सतत तणावाची स्थिती निर्माण होते. नंतर या ताणावाचे रूपांतर ऊर्जेत होते आणि त्यामुळे सर्वसामान्यपणे भूकंपाचे धक्के बसतात. जर ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात सोडली गेली, तर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवतात किंवा या भूकंपाच्या धक्यांची तीव्रता खूप जास्त असते.

भारतात मोठ्या भूकंपाची शक्यता : आयआयटी कानपूरचे प्राध्यापक जावेद मलिक यांनी दावा केला आहे की, भारतातही तुर्कीप्रमाणेच मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीपासून लखनऊपर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. येत्या काही दिवसांत भारतात भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आयआयटी कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांनी याबाबत संशोधन केले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिमालय किंवा अंदमान निकोबार किंवा कच्छ असू शकतो असा त्यांचा दावा आहे.

हेही वाचा : Earthquake In Sikkim : सिक्कीममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 4.3 एवढी तीव्रता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.