ETV Bharat / bharat

Earthquake in Afghanistan: अफगाणिस्तानात भूकंपाचा धक्का! सुमारे एक हजार लोकांचा मृत्यू;600 लोक जखमी

author img

By

Published : Jun 22, 2022, 5:07 PM IST

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS)च्या मते, बुधवारी पहाटे अफगाणिस्तानात भूकंपाचा धक्का बसला. रिअॅक्टर स्केलवर ते 6.1 मोजले गेले. (USGS)ने सांगितले की भूकंपाचा केंद्रबिंदू खोस्ट शहरापासून 46 किमी अंतरावर पाकिस्तान सीमेजवळ होता. भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या पक्तिका आणि खोस्ट प्रांतातील दुर्गम भागात अद्यापही बचाव पथके पोहोचू शकलेली नाहीत.

अफगाणिस्तानात भूकंपाचा धक्का
अफगाणिस्तानात भूकंपाचा धक्का

काबुल (अफगाणिस्तान) अफगाणिस्तानमधील भीषण भूकंपातील मृतांची संख्या आता 1000 च्या जवळ पोहोचली आहे. तालिबान सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर पोहोचली आहे. या घटनेत 600 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या पक्तिका आणि खोस्ट प्रांतातील दुर्गम भागात अद्यापही बचाव पथके पोहोचू शकलेली नाहीत. अशा परिस्थितीत या भूकंपामुळे मृतांचा आकडा लक्षणीय वाढणार असल्याचे मानले जात आहे. अनेक तालिबान अधिकार्‍यांनी स्वतः सांगितले आहे की भूकंपामुळे प्रभावित अनेक भागात मदत आणि बचाव पथके अजूनही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, बुधवारी पहाटे अफगाणिस्तानला भूकंपाचा धक्का बसला. रिअॅक्टर स्केलवर ते 6.1 मोजले गेले. (USGS)ने सांगितले की भूकंपाचा केंद्रबिंदू खोस्त शहरापासून 46 किमी अंतरावर पाकिस्तान सीमेजवळ होता. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारमधील आपत्ती व्यवस्थापनाचे उपमंत्री मौलवी शराफुद्दीन मुस्लिम यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, "आतापर्यंत आमच्याकडे किमान 920 लोक ठार आणि 600 जखमी झाल्याची माहिती आहे."

यापूर्वी तालिबानच्या अंतर्गत मंत्रालयाचे अधिकारी सलाहुद्दीन अयुबी यांनी सांगितले होते की, काही गावे डोंगरात दुर्गम भागात असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि तपशील गोळा करण्यास थोडा वेळ लागेल. पक्तिका प्रांतातील आदिवासी नेता याकूब मंझोरे यांनी सांगितले की, वाचलेले लोक पीडितांना मदत करण्यासाठी एकत्र येत आहेत. त्यांनी सांगितले की स्थानिक बाजारपेठा बंद आहेत आणि सर्व लोक प्रभावित भागात पोहोचले आहेत.

पक्तिका प्रांतातील व्हिडिओ फुटेजमध्ये या भागातील पीडितांना एअरलिफ्ट करण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात केले जात असल्याचे दिसून आले आहे. या व्हिडिओंमध्ये भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेली घरेही दिसत आहेत. ज्याभोवती लोक फिरताना दिसत आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते, की केवळ मातीच नाही तर काँक्रीटची घरेही पत्त्याच्या गठ्ठासारखी कोसळली. या भूकंपाची तिव्रता सुमारे 200 किमी परिसरात पसरली होती.

हेही वाचा - ३४ आमदारांच्या पत्रासह अधिकृत गटनेतेपदावर शिंदे यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.