डेहराडून - उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी येथून 23 किलोमीटर अंतरावर शनिवारी रात्री 1.28 वाजता भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (एनसीए) माहितीनुसार भुकंपाची तीव्रता ही ३.४ रिश्टरची राहिली आहे. भूकंपात नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
उत्तराखंडला 23 मे रोजी रात्री 12 वाजता चामोली, उत्तरकाशी आणि डेहराडून जिल्ह्याला भूकंपाचे धक्के बसले होते. तेव्हा भूकंपाचे 4.3 रिश्टरचे धक्के बसले होते. भूकंपाचे केंद्र जोशीमठपासून 43 किलोमीटर अंतरावर होते. भूकंपाच्या धक्क्याने घरांमधून लोक बाहेर पडले. मसूरी येथील भूकंपाच्या धक्क्याने अनेक घरांमधील वस्तू हलत असल्याचे नागरिकांना दिसले होते.
हेही वाचा-VIDEO वर्ध्यात वीज बिल वसुलीला गेलेल्या अभियंत्याला दुकानदारांकडून मारहाण
दोन दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये भूकंपाचे धक्के
दरम्यान, राजस्थानच्या बिकानेरमध्ये भूकंपाचे पुन्हा धक्के जाणवले आहेत. आज सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी हा भूंकप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 नोंदविली गेली आहे. भूकंपामुळे आतापर्यंत कोणतेही नुकसान झाले नाही.
हेही वाचा-सरकारी कार्यालयांत फोनवर बोलताना अधिकारी- कर्मचाऱ्यांना 'हे' पाळावे लागणार नियम