ETV Bharat / bharat

Earthquake in sriganganaga : राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये भूकंप; लोकांमध्ये भीतीचे वातावरण - राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये भूकंप

श्रीगंगानगर जिल्ह्यातील घाडसाना ( EarthQuake in Rajasthan ) आणि अनुपगडमध्ये बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोक घराबाहेर पडले.

Earthquake in sriganganaga
Earthquake in sriganganaga
author img

By

Published : Oct 20, 2022, 2:22 PM IST

श्रीगंगानगर : जिल्ह्यातील घाडसाना आणि अनुपगड येथे बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री लोक झोपायला जात असताना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक घराबाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री श्री गंगानगरच्या घडसाना आणि अनुपगडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. काही दिवसांपूर्वी अनुपगडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. ( Earthquake tremors felt in Sriganganagar )

यापूर्वी सोमवारी पहाटे बिकानेर आणि श्री गंगानगरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. राजधानी जयपूरमध्ये भूकंपाची तीव्रता रेक्टर स्केलवर 3.6 एवढी होती. दुपारी १२.३६ च्या सुमारास बिकानेर ते टोंक, बुंदीपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. बिकानेरच्या वायव्येला झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, सोमवारी अनुपगढ, श्री गंगानगरमध्ये लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. येथेही त्याची तीव्रता रेक्टर स्केलवर 4.1 होती, हे धक्के दुपारी 12.27 च्या सुमारास जाणवले. मात्र, कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

का होतात भूकंप ? पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण, कवच. कवचाच्या वरच्या आवरण गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात. हा 50-किमी-जाड थर अनेक विभागांमध्ये विभागलेला आहे ज्याला टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात. या टेक्टोनिक प्लेट्समध्ये जेव्हा कंपन कंपने होतात तेव्हा भुंकप होते.

काय आहे भुकंपाची कारणे : मानवाने निसर्गाशी केलेल्या छेडछाडीमुळे देखील भुकंप होते. तर, कधी नैसर्गिक आपत्तीमुळे भुकंप होतो. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे, मोठ मोठया धरणाचा जमिनीवर पडणारा ताण, खाण काम, मोठया रस्त्याचा भुसुरुंग, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.