पाटणा० Earthquake In Bihar : बिहारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळच्या सुमारास मोतिहारी आणि छपरासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पृथ्वी हादरली. मोतिहारीमध्ये तीन सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले.
- बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंप : बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज सकाळी पृथ्वी हादरली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7.28 च्या सुमारास भूकंप झाला. बिहारमधील मोतिहारी, छपरा, बगाहा, सिवान आणि गोपालगंजसह इतर अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच अनेक लोक घराबाहेर पडले. मात्र, आतापर्यंत कुठूनही जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.
-
An earthquake of magnitude 5.3 strikes Nepal: National Center for Seismology pic.twitter.com/J5lyp8RLuh
— ANI (@ANI) October 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">An earthquake of magnitude 5.3 strikes Nepal: National Center for Seismology pic.twitter.com/J5lyp8RLuh
— ANI (@ANI) October 22, 2023An earthquake of magnitude 5.3 strikes Nepal: National Center for Seismology pic.twitter.com/J5lyp8RLuh
— ANI (@ANI) October 22, 2023
- भूकंपाचं केंद्र काठमांडू, नेपाळ : भूकंपाचं केंद्र काठमांडू, नेपाळजवळ असल्याचं सांगितलं जातंय. बोल्दे फेडीचेपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर याचं केंद्र असल्याचा अंदाज आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 इतकी मोजण्यात आलीय. मात्र, कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. नेपाळशिवाय चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यापूर्वी 3 ऑक्टोबरलाही नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.
- भूकंप का होतात? : भूविज्ञान तज्ञ म्हणतात की पृथ्वीवर 12 टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स एकमेकांवर आदळल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला भूकंप म्हणतात. या प्लेट्स अतिशय संथ गतीनं फिरत राहतात. या प्लेट्स त्यांच्या जागेवरून दरवर्षी 4 ते 5 मिमीनं सरकतात. अशा परिस्थितीत, जेव्हा एक प्लेट दुसर्यापासून दूर जाते तेव्हा ती दुसर्या खालून सरकते. या प्रक्रियेदरम्यान, प्लेट्सच्या टक्करमुळं भूकंप होतो.
- उत्तराखंडमध्येही आला होता भूकंप : गेल्या आठवड्यात उत्तराखंड राज्यातही भूकंपाचे झटके जाणवले होते. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. तेव्हाही सुदैवानं कोणतीही जिवितहानी झाली नव्हती. मात्र भूंकपामुळं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालंय.
हेही वाचा :
Delhi Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तर भारत हादरला, दिल्लीतही जाणवले धक्के
Koyna Dam Earthquake: कोयना धरणाचा परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला, कोणतीही हानी नाही