ETV Bharat / bharat

DSP Murdered : अवैध खाण माफियांकडून डीएसपींची हत्या.. डंपरखाली चिरडले.. - DSP crushed by dumper

हरियाणातील नूह जिल्ह्यात अवैध खाण माफियांनी ( illegal mining mafia in nuh haryana ) डीएसपीला डंपरने ( DSP crushed to death ) चिरडले. तवाडू येथील डीएसपी सुरेंद्र सिंह ( dsp surender singh bishnoi ) अवैध खाण माफियांवर छापा टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच सरकारने मृत डीएसपीच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

DSP Murdered
अवैध खाण माफियांकडून डीएसपींची हत्या.. डंपरखाली चिरडले..
author img

By

Published : Jul 19, 2022, 6:49 PM IST

नूह ( हरियाणा ) : हरियाणातील बेकायदेशीर खाण माफियांची ( illegal mining mafia in nuh haryana ) दहशत इतकी वाढली आहे की त्यांनी एका डीएसपीची हत्या ( DSP crushed to death ) केली. हे प्रकरण हरियाणातील नूह जिल्ह्यातील आहे. जेथे तवाडूचे डीएसपी सुरेंद्र सिंह बिश्नोई ( dsp surender singh bishnoi ) अवैध खाण माफियांवर छापा टाकण्यासाठी गेले होते. परंतु अवैध खाण माफियांनी डंपरखाली चिरडून त्यांची हत्या केली. आदमपूर, हिसार येथे बुधवारी मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डीएसपीला डंपरने चिरडले- पाचगाव परिसरातील डोंगरात अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती डीएसपीला मिळाली होती. माहिती मिळताच डीएसपी सुरेंद्र सिंह बिश्नोई अवैध खाण माफियांवर छापा टाकण्यासाठी गेले. यादरम्यान खाण माफियांच्या लोकांनी त्याच्यावर डंपर चढवला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अवैध खाण माफियांकडून डीएसपींची हत्या.. डंपरखाली चिरडले..

आरोपींचे पलायन : डीएसपीला ठेचून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले, त्यानंतर पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन नुह येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. अवैध खाण माफियांकडून डीएसपीला डंपरने चिरडण्यात आल्याच्या वृत्ताने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. नूहमधील डीएसपीच्या हत्येनंतर हरियाणातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हिसारमध्ये होणार अंत्यसंस्कार- डीएसपी सुरेंदर सिंह बिश्नोई हे हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील रहिवासी होते. हिसार येथील सारंगपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुरेंद्र सिंग यांना दोन मुले असून मुलगी बंगळुरू येथे बँकेत काम करते तर मुलगा कॅनडामध्ये शिकत आहे. सुरेंद्र सिंह यांचा धाकटा भाऊ अशोक हरियाणातील एका सहकारी बँकेत अधिकारी आहे. अशोकने सांगितले की, आज सकाळी आठ वाजता भावासोबत फोनवर बोलणे झाले. त्यांनी घरी लवकर येईन असे सांगितले होते. मात्र दुपारी त्यांच्या मृत्यूची बातमी आली. कुटुंबात शोकाचे वातावरण असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांकडून होत आहे.

मृत डीएसपीच्या नातेवाईकांना एक कोटी- हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नूह येथे मारल्या गेलेल्या डीएसपीच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. हरियाणा सरकार डीएसपी सुरेंदर सिंग यांना शहीद दर्जा देणार आहे. डीएसपीच्या मारेकऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी म्हटले आहे. कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

गृहमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश- हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. अनिल विज म्हणाले की, आरोपींना पकडण्यासाठी कितीही पोलीस बंदोबस्त लागत असला, तरी शेजारील जिल्ह्यांतूनच पोलीस बोलावावे लागले तरी चालेल. याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडले जाणार नाही.

विरोधकांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले- नूहमध्ये डीएसपीचा डंपरने चिरडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात काँग्रेसने सरकारवर हल्ला चढवला आहे. विरोधी पक्षनेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत हरियाणात माफिया राज सुरू असून, या सरकारमध्ये त्यांना संरक्षण मिळत असल्याचे सांगितले. हरियाणात पोलीसच सुरक्षित नसताना सर्वसामान्यांची सुरक्षा कशी होणार, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

न्यायालयीन चौकशीची मागणी : काँग्रेसचे राज्यसभा खासदार रणदीप सुरजेवाला यांनी हरियाणातील डीएसपीच्या हत्येची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडे या प्रकरणाची चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करून दोषींना लवकरात लवकर अटक करावी, असे ते म्हणाले. सुरजेवाला म्हणाले की, भाजपच्या राजवटीत खाण माफिया फोफावत आहेत. हरियाणात यमुनानगर ते मेवातपर्यंत खाण माफिया हरियाणाची लूट करत असून सरकार गप्प बसले आहे.

हेही वाचा : Pak Infiltrator : नूपुर शर्माच्या हत्येसाठी पाकिस्तानातून आला घुसखोर.. सीमा ओलांडली अन् बीएसएफच्या जवानांनीं मुसक्या आवळल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.