ETV Bharat / bharat

'पंच प्यारे' विधानावरून हरीश रावत वादाच्या भोवऱ्यात; वाचा काय प्रकरण...

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद शिगेला पोहचत असून तो सोडवण्यासाठी मंगळवारी पक्षाचे प्रभारी हरीश रावत चंदीगढमध्ये दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना, त्यांनी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांचे चार कार्यकारी अध्यक्षांचा उल्लेख 'पंच प्यारे' असा केला. यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला असून रावत यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हरीश रावत
हरीश रावत
author img

By

Published : Sep 1, 2021, 10:59 AM IST

नवी दिल्ली - पंजाब विधानसभा निवडणुका जवळ येत असून अनेक कारणांवरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटत आहेत. पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद शिगेला पोहचत असून तो सोडवण्यासाठी मंगळवारी पक्षाचे प्रभारी हरीश रावत चंदीगढमध्ये दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना, त्यांनी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांचे चार कार्यकारी अध्यक्षांचा उल्लेख 'पंच प्यारे' असा केला. यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला असून रावत यांनी माफी मागावी, अशी मागणी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे माजी प्रमुख मनजिंदरसिंग सिरसा यांनी केली.

'पंच प्यारे' विधानावरून हरीश रावत यांनी माफी मागावी - सिरसा

नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांचा 'पंच प्यारे' असा उल्लेख हा धार्मिक अपमान आहे. गुरु गोविंद सिंग यांनी सुरू केलेल्या प्रथेचा रावत यांनी अपमान केला आहे. कोणत्याही सामान्य व्यक्तींचा धार्मिक शब्दांनी उल्लेख केला जात नाही, असे ते म्हणाले. रावत यांच्या विधानावर अकाली दल सुद्धा नाराज झाला आहे. रावत यांनी धार्मिक भावनांना ठेस पोहचवली आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, असे अकाली दलाने म्हटलं.

काय म्हणाले होते रावत?

सिद्धू आणि पंजाब काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष यांची भेट घेतल्यानंतर हरिश रावत म्हणाले, की “पीसीसी प्रमुख आणि त्यांच्या टीमची भेट घेणे, 'पंच प्यारे' (सिद्धू आणि त्यांचे 4 कार्यकारी अध्यक्ष) यांच्यासोबत चर्चा करणे माझी जबाबदारी होती. निवडणूक आणि संघटनात्मक रचनेला वेग दिल्याचेही त्यांनी सांगितले होते.

'पंच प्यारे' काय आहे?

पंज प्यारे किंवा 'पंच प्यारे' यांना शिख धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. गुरू गोविंदसिंगांनी इ. स. १६९९ मध्ये शीख दीक्षाविधीची सुरुवात केली. तेव्हा पाच शिष्यांनी पहिल्यांदा गुरूंकडून दीक्षा घेतली. हे पाच शिष्य म्हणजे भाई दयासिंग, भाई धरमसिंग, भाई मोहकमसिंग, भाई साहिबसिंग आणि भाई हिंमतसिंग. यांना शीख पंज प्यारे (पंच प्यारे)म्हणतात. यानंतर त्यांच्याकडून म्हणजेच आपल्या शिष्यांकडून स्वतः गुरू गोविंदसिंग यांनी दीक्षा घेतली होती.

हेही वाचा - 'या' राज्यातील शाळा आजपासून उघडणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.