ETV Bharat / bharat

अस्थी आणि स्नायू वेदनेने त्रस्त आहात; मग 'हा' उपाय ठरू शकतो तुमच्यासाठी आरामदायी - अस्थी आणि स्नायू वेदना

स्नायुंमधील वेदनावर उपचार करण्यासाठी ड्राय नीडलिंग उपचारपद्धतीची आज संपूर्ण जगभर शिफारस केली जाते आणि व्यापक प्रमाणात तिचा स्विकार केला गेला आहे.

अस्थी आणि स्नायू वेदनेवर प्रभावकारी उपाय

author img

By

Published : Apr 9, 2021, 5:27 PM IST

अस्थी आणि स्नायुंच्या वेदना कमी करण्यासाठी ड्राय नीडलिंग उत्तम उपचार स्नायुंमध्ये होणाऱ्या वेदना या अत्यंत क्लेशदायक असतात आणि अशा वेदना होणारा रूग्ण वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी कोणताही उपाय करण्यासाठी सैरावैरा धावत असतो. ड्राय नीडलिंग म्हणजे वेदना होणाऱ्या भागांमध्ये इंजक्शनच्या कोरड्या सुईचे टोक त्वचेतून आत आवश्यक त्या प्रमाणात टोचत राहिले तर वेदनांपासून दिलासा मिळतो, असे निरिक्षणांवरून समोर आले आहे. ईटीव्ही भारत सुखीभव टिमने फिजिओथेरपीस्ट आणि अल्टरनेटिव्ह मेडिसिन तज्ञ आणि योग शिक्षिका डॉ. जान्हवी कथरानी यांच्याशी या विषयावर अधिक जाणून घेण्याविषयी चर्चा केली. ड्राय नीडलिंग कसे करतात हे प्रथम समजून घेऊ या.

ड्राय नीडलिंग ही मुख्यतः वेदना कमी करण्यासाठी आणि शरिरातील अवयव जेव्हा काम करू शकण्यास असमर्थ ठरतात तेव्हा, बहुतेक फिजिओथेरपीस्ट तज्ञांकडून वापरली जाणारी उपचारपद्धती आहे. नावाप्रमाणेच ड्राय नीडलिंग उपचारात निर्जतुकीकरण केलेल्या सुईचे टोक शरिराच्या आतील भागात त्वचेतून आवश्यकतेनुसार तितक्या खोलीपर्यंत घुसवले जाते. मात्र, ड्राय नीडलिंग उपचारपद्धतीत वापरल्या जाणाऱ्या सुया या नेहमीच्या इंजक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या सुईपेक्षा दहा पटींनी जास्त बारिक असतात. (इंजक्शनसाठी वापरल्या जाणार्या सुईची रूंदी २.९ मिलिमीटर असते तर ड्राय नीडलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या सुईचे टोक ०.१६ मिमी. ते ०.३ मिमी. रूंद असते). त्यामुळे त्या त्वचेत टोचल्या जात असताना इंजक्शनच्या सुईपेक्षा खूपच कमी प्रमाणात वेदना होतात. स्नायुंमधील वेदनावर उपचार करण्यासाठी ड्राय नीडलिंग उपचारपद्धतीची आज संपूर्ण जगभर शिफारस केली जाते आणि व्यापक प्रमाणात तिचा स्विकार केला गेला आहे.

दोन प्रकारच्या ड्राय नीडलिंग उपचारपद्धती सामान्यपणे नेहमी वापरल्या जातात.

१. ज्याला सामान्यपणे डीप ड्राय नीडलिंग म्हटले जाते म्हणजे विशिष्ट स्नायुंच्या पेशीजालात सुईचे टोक खुपसणे.

२. पृष्ठभागावरील ड्राय नीडलिंग म्हणजे स्नायुच्या वरवरच्या भागात सुईचे टोक घुसवणे. ड्राय नीडलिंग हे अगदी अक्युपंक्चरसारखेच आहे काय? नाहि. ड्राय नीडलिंग उपचारपद्धती ही शरिरशास्त्रात वापरली जाणारी आहे तर अक्युपंक्चर ही पद्धती केवळ शरिराच्या बाह्य त्वचेवर केली जाणारी उपचार पद्धती (उर्जा प्रवाहांमध्ये) आहे.

ड्राय नीडलिंग उपचार पद्धती का घेतली पाहिजे?
• स्नायुंमधील गाठी/ताण/ताठर स्नायु मोकळे करण्यासाठीचा सर्वात जलद उपाय
• बहुविध लाभ देणारी उपचारपद्धती
• अत्यंत अचूक उपचार कोणत्या परिस्थितीत मी ड्राय नीडलिंग उपचारपद्धतीचा पर्याय स्विकारला पाहिजे?
• जर तुम्हाला स्नायुंमध्ये किंवा शरिरतील सांध्यांमध्ये वेदना होत असतील तर
• ताठर स्नायु किंवा स्नायुंमध्ये ताठपणा आला असेल तर
• मान किंवा पाठीतील असह्य वेदना
• न जाणारे डाग किंवा व्रण घालवायचे असतील तर
• स्नायु किंवा अस्थी प्रणालीमधील घटकांमुळे होणारी डोकेदुखी, तणावाने होत असलेली डोकेदुखी किंवा अर्धशिशी( अर्धे डोके तीव्र प्रमाणात दुखणे)
• अस्थिंच्या किंवा स्नायुंमधील ट्रिगर पॉईंट किंवा ताणलेल्या मज्जातंतूमुळे होणार्या वेदना
• तीव्र वेदना
• दिर्घकालापासून सुरू असलेल्या वेदना
• अस्थी आणि स्नायुंमधील वेदनांची स्थिती जसे की खांद्यामधील वेदना, टेनिस एल्बो,खांद्याचे स्नायु गोठणे, पायाच्या टाचेमध्ये होणार्या असह्य वेदना, स्नायुंना हाडांशी जोडणाऱ्या तंतुंमध्ये सातत्याने होणारा दाह, पायाच्या मागील भागात वेदना होणे(काफ पेन)
• हाडांवरील शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतरच्या अवस्थेत
• पायांच्या नसांमध्ये वेदना होणे उदा. सायाटिका
• शरिराच्या कार्यप्रणालीतील उद्भवलेले आजार

ड्राय नीडलिंगचे उपचार केव्हा टाळावेत?
• सुईची विकृती असेल तर
• अशा उपचारांबद्दल विशिष्ट सांस्कृतिक पगडा किंवा अंधश्रद्धा असतील तर
• पूर्वी नीडलिंग केल्यानंतर काही विपरित परिणाम झाल्याचा किंवा गुंतागुंत निर्माण झाल्याचा इतिहास असल्यास
• वैद्यकीय आणिबाणी
• मानसिक रूग्ण असलेले(मानसिक आरोग्याची समस्या असलेले रूग्ण)
• संवादाची समस्या असेल तर(वयाशी संबंधित, भाषेचा अडथळा आदी)
• परवानगीच्या अर्जावर स्वाक्षरी केलेली नसेल तर
• अतिप्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास किंवा रक्तात गाठी होत असल्याच्या तक्रारीवरून उपचार चालू असतील तर
• कर्करोग, एचआयव्ही सारखे रक्तातून उद्भवलेले आजार असतील तर
• वेदना असलेल्या भागावरील जखमेत पू झाला असेल तर
• पाच वर्षांखालील मुलांमध्ये ड्राय नीडलिंग उपचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण या वयात त्यांच्या स्नायु आणि अस्थींच्या विकासाची प्रक्रिया सुरू असते. अस्थी आणि स्नायुपेशींमध्ये अत्यंत कमजोरी असलेल्या वृद्ध रूग्णांसाठीही या उपचार पद्धतीची शिफारस केली जात नाही.

ड्राय नीडलिंग उपचार घेतल्यानंतर काय परिणाम होतात आणि होणारे लाभ कोणते?
• ड्राय नीडलिंग उपचार घेतल्यानंतर शरिरात सुखद अनुभूती देणाऱ्या रसायनांचा स्त्राव सुरू होतो (न्यूरोट्रान्समीटर)
• वेदना होत असलेल्या ठिकाणी रक्ताचा प्रवाह वाढून वेदना थांबल्याचा अनुभव येतो
• प्राणवायुचा तुटवडा दूर होऊन ड्राय नीडलिंग केलेल्या ठिकाणी चेतना जाणवते.
• वेदनांपासून सुटका होण्याच्या नैसर्गिक परिणामांची उत्तेजना वाढते.
• ड्राय नीडलिंगमुळे त्वचा तसेच अस्थीस्नायुं रचनेत असलेला तणाव कमी होतो आणि आरामदायक वाटू लागते.
• विशेषतः जुनाट आजार असतील तर जेथे वेदना होतात त्या भागात प्रज्वलनाने वेदना कमी होऊन त्या ठिकाणी घाव भरून येतात.
धिक माहितीसाठी, डॉ. जान्हवी कथरानी यांच्याशी jk.swasthya108@gmail.com यावर संपर्क साधा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.