ETV Bharat / bharat

गुजरात : पाकिस्तानी जहाजातून 300 कोटींचे अमली पदार्थ जप्त, 9 जाणांना अटक

कच्छमधील सागरी सिमेवर पाकिस्तानी जहाजातून 56 कि.ग्रा हेरॉईन जप्त ( Drug seize from Pakistani ship in Gujrat ) करण्यात आले असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएस ( Gujrat ats seize drug ) आणि तटरक्षक दलाने सयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Apr 25, 2022, 1:03 PM IST

अहमदाबाद - कच्छमधील सागरी सिमेवर पाकिस्तानी जहाजातून 56 कि.ग्रा हेरॉईन जप्त ( Drug seize from Pakistani ship in Gujrat ) करण्यात आले असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएस ( Gujrat ats seize drug ) आणि तटरक्षक दलाने सयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले नऊ जण पाकिस्तानी असण्याची शक्यता असल्याने त्यांची अधिक चौकशी करण्यात येत आहे. बोटीचे नाव अलहज ( Drug seize from Pakistani ship Al haj ) असे असून अमली पदार्थाची किंमत 300 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा - सोमैया यांच्याकडून गृहसचिवांची भेट! आवश्यक ती कारवाई करण्याची ग्वाही दिल्याची माहिती

ड्रग सिंडिकेटचा प्रयत्न फसला - ड्रग सिंडिकेटचा गुजरातच्या सागरी सीमेचा वापर करून अमली पदार्थांची तस्करी करण्याचा आणखी एक प्रयत्न सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडला आहे. गुजरात एटीएसला अलहज या पाकिस्तानी जहाजात मोठ्या प्रमाणात हेरॉईन हे अमली पदार्थ येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले आणि तटरक्षक दलासह संयुक्त कारवाई सुरू केली. जहाजातून कोट्यवधींचे हेरॉईन जप्त करून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. हेरॉईनची बाजारातील किंमत 300 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी गुजरात एटीएस पुढील तपास करत आहे.

हेही वाचा - झेलेन्स्की यांच्याकडून युद्ध संपवण्याची तयारी; पुतीन यांना भेटीची केली मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.