नवी दिल्ली - भारत-म्यानमार सीमेवर सोने तस्करी करणारे दोन ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या विदेशातील सोन्याची तस्करी या वाहनांमधून केली जात होती. याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे हे सोने पंजाबमधून आणण्यात आले होते.
घटना काय?
गुप्त माहितीनुसार दोन संशयित ट्रक भारत-म्यानमार सीमेवर सोन्याची वाहतूक करत होते. या दोन्ही ट्रकची सखोल तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात 35 कोटी रुपये किंमतीचे सोने आढळले. पंजाबमधून हे सोने आणले गेले होते. ट्रकमधील सोने इंधन टाकीच्या आतमध्ये लपवण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरु आहे.
हेही वाचा - अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर..! बीएमसीची २९ मॉलना कारणे दाखवा नोटीस; कायदेशीर कारवाईही होणार
याआधीही सोने वाहतूक
यापूर्वी ऑगस्टमध्येही डीआरआयने दिल्ली रेलवे स्टेशनवरुन 83.6 किलो जप्त केले होते. त्या सोन्याची तस्करीदेखील भारत-म्यानमार सीमा रोडवरुन केली जात होती. ते सोने 99.9 टक्के शुद्ध असल्याचेही समोर आले होते.
हेही वाचा - फुकट मिळालेल्या सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, चंद्रकांत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया