ETV Bharat / bharat

DRDO मध्ये मोठ्या पगारावर नोकरी करण्याची सुवर्ण संधी, थेट मुलाखतीद्वारे होणार नियुक्ती

author img

By

Published : May 25, 2022, 1:49 PM IST

संरक्षण क्षेत्रात नोकरीचा शोध घेणाऱ्या तरुणांसाठी सुवर्ण संधी मिळाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने 54,000 रुपये मासिक वेतनासह संशोधन सहयोगी पदांसाठी भरती काढण्यात आली आहे.

DRDO
DRDO

जोधपूर (राजस्थान) - संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने 54,000 रुपये मासिक वेतनासह संशोधन सहयोगी पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. थेट मुलाखती द्वारे या पदाची भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार डिफेन्स लॅबोरेटरी, रतनदा पॅलेस, जोधपूर (राजस्थान) येथे दिलेल्या तारखेला आणि वेळेत मुलाखतीसाठी येऊ शकतात.

एकूण रिक्त पदांची संख्या 3 आहे, आणि मुलाखतीच्या तारखेला कमाल वय 35 वर्षे असावी अशी अट आहे. यासाठी 2 वर्षे फेलोशिपही देण्यात येणार आहे.

सध्या फेलोशिप वेतन - HRA आणि नियमांनुसार वैद्यकीय सुविधांसह दरमहा रु 54,000.

वयोमर्यादा -

  • मुलाखतीच्या तारखेच्या वेळी वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, SC/ST/PH साठी 5 वर्षांपर्यंत आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांपर्यंत वय शिथिलता आहे.
  • SC/ST/OBC प्रवर्गातील उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले मूळ जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

पात्रता निकष/शैक्षणिक पात्रता -

रसायनशास्त्र/भौतिकशास्त्र/मटेरियल सायन्समध्ये पीएचडी किंवा समकक्ष पदवी किंवा संशोधन, अध्यापन आणि डिझाइन आणि विकासाचा तीन वर्षांचा अनुभव असावा.

हेही वाचा - 3 Pakistani militants killed : क्रेरी भागात दहशतवाद्यांबरोबर सुरक्षा दलाची चकमक; ३ पाकिस्तानी दहशतवादी ठार, एक पोलीस शहीद

तीन रिसर्च असोसिएट पदांचा तपशील पुढीलप्रमाणे -

DRDO
तीन रिसर्च असोसिएट पदांचा तपशील

मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची प्रक्रिया -

  • पात्र उमेदवारने नमूद केलेल्या तारखेला 10:00 वाजता संरक्षण प्रयोगशाळा, रतनदा पॅलेस, जोधपूर (राजस्थान) येथे मुलाखतीसाठी थेट उपस्थित राहणे.
  • मुलाखतीला हजर असताना, उमेदवारांनी अलीकडील पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह संपूर्ण बायोडेटा आणि सर्व पदवी/शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे/मार्क शीट/अनुभव प्रमाणपत्र इत्यादींच्या झेरॉक्सच्या प्रती सादर करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांना वय, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाशी संबंधित मूळ प्रमाणपत्रे सादर करावी लागणार आहेत.
  • सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांनी एनओसी सादर करणे आवश्यक आहे.

हेही वाचा - Sugar Export Restricted : साखरेच्या निर्यातीवर केंद्र सरकारचे निर्बंध..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.