मुंबई : डॉ. प्रदीप कुरुलकरने वर्षभरात अनेकदा परदेशात भेटी दिल्या. या काळात तो पाकिस्तानी हेरांना भेटल्याचा संशय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तहेर असलेल्या महिलांच्या संपर्कात असलेला डॉ. प्रदीप कुरुलकर हनीट्रॅपमध्ये अडकून महिलांच्या अश्लील फोटोंच्या बदल्यात ब्राह्मोस आणि अग्नी क्षेपणास्त्राची गुप्त माहिती पुरवल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे.
अनेक धक्कादायक बाबी उघडकीस : गुप्तचर यंत्रणेला याची माहिती जानेवारी महिन्यात हाती लागली होती. हालचाली संशयास्पद आढळल्याने प्रदीप कुरुलकरचा लॅपटॉप व मोबाइल जप्त केला. डीआरडीओच्या समितीकडे याची चौकशी सोपवली होती. चौकशीत तो दोषी आढळल्यानंतर त्यांच्याकडील लॅपटॉप आणि मोबाईल एटीएसएच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे सोपविण्यात आला होता. त्याची तपासणी केल्यावर अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत असल्याचे आढळून आले आहे.
२०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात : संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ कुरुलकर सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. भेटीदरम्यान कोणती कार्यालयीन गोपनीय माहिती दिली. त्यासाठी कोणत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर केला. ही गोपनीय माहिती आर्थिक फायद्यासाठी दिली की, अन्य काही कारणे होती, याचा तपास रॉचे अधिकारी करत आहेत.
पाकिस्तानी हेरांना नेमकी काय माहिती कुरुलकरने दिली : कुरुलकर याची गुप्तचर यंत्रणेच्या रिसर्च अॅन्ड अॅनालिसिस विंग (रॉ) च्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. कुरुलकर यांनी पाकिस्तानी हेरांना नेमकी काय माहिती कुरुलकरने त्यावेळी पुरविली, ते हॅनी ट्रॅपमध्ये कसे अडकले, याची माहिती अधिकारी घेत आहेत.
1. हेही वाचा : Karnataka polls 2023 : निवडणुकीत भाजप रडीचा डाव खेळण्याची काँग्रेसला भीती; बुथ कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आदेश