ETV Bharat / bharat

DRDO: भारतीय लष्कराने 'QRSAM'च्या 6 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे केल्या पूर्ण - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)कडून मिळालेल्या माहितीनुसार, मूल्यमापन चाचण्यांचा भाग म्हणून भारतीय लष्कराकडून उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या आहेत. भारतीय लष्कर आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज गुरुवार (8 सप्टेंबर)रोजी क्विक रिअॅक्शन सरफेस टू एअर मिसाईल (QRSAM) ची यशस्वी चाचणी घेतली आहे

भारतीय लष्कराने 'QRSAM'च्या 6 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे केल्या पूर्ण

author img

By

Published : Sep 8, 2022, 3:40 PM IST

बालासोर (ओडिशा) - भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीवरून क्विक रिअॅक्शन सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्र (QRSAM) प्रणालीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO)ने गुरुवारी सांगितले की, या क्षेपणास्त्र प्रणालीच्या सहा चाचण्या यशस्वीपणे घेण्यात आल्या आहेत. त्यात म्हटले आहे, की विविध परिस्थितींमध्ये शस्त्रास्त्र यंत्रणेच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी, विविध प्रकारच्या धोक्यांचे मॉडेलिंग, हाय-स्पीड हवाई लक्ष्यांवर उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

  • #WATCH | DRDO & Indian Army have successfully completed 6 flight tests of Quick Reaction Surface to Air Missile (QRSAM) system from Integrated Test Range (ITR) Chandipur, off the Odisha Coast. The flight tests have been conducted as part of evaluation trials by Indian Army: DRDO pic.twitter.com/IB5eF23jkC

    — ANI (@ANI) September 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कॅप्चर केलेल्या डेटाद्वारे या प्रणालीच्या कार्यप्रदर्शनाची पुष्टी केली - या चाचण्यांदरम्यान, सर्व मिशनची उद्दिष्टे साध्य करण्यात आली आणि शस्त्रास्त्र साखळ्यांसह अत्याधुनिक मार्गदर्शन आणि नियंत्रण अल्गोरिदमसह शस्त्र प्रणाली अचूकता स्थापित केली गेली, असे (DRDO)ने एका निवेदनात म्हटले आहे. एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) द्वारे स्थापित केलेल्या टेलीमेट्री आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम (EOTS) सारख्या अनेक उपकरणांद्वारे कॅप्चर केलेल्या डेटाद्वारे या प्रणालीच्या कार्यप्रदर्शनाची पुष्टी केली गेली आहे, असे त्यात म्हटले आहे.

भारतीय लष्कराचे अभिनंदन केले - क्षेपणास्त्र प्रणाली सर्व स्वदेशी उपकरणांनी सुसज्ज आहे, ज्यामध्ये स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेन्सी क्षेपणास्त्र, मोबाइल लाँचर, पूर्णपणे स्वयंचलित कमांड आणि कंट्रोल सिस्टम आणि पाळत ठेवणारे रडार यांचा समावेश आहे. ही यंत्रणा आता लष्कराच्या ताफ्यात सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि भारतीय लष्कराचे अभिनंदन केले आहे.

चाचणी दिवसा आणि रात्री अशा दोन्ही परिस्थितीत घेतली - ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजवरून सहा क्षेपणास्त्रे डागण्यात आली. क्षेपणास्त्रे डागताना, ते जलदगतीने जवळ येणाऱ्या लक्ष्यांवर अचूकतेने हल्ला करण्यास सक्षम आहेत, की नाही हे पाहिले गेले. परीक्षेदरम्यान विविध परिस्थिती निर्माण झाल्या आहेत. ज्यामध्ये शत्रूचे हवाई लक्ष्य खूप वेगाने येते. ते दूर करण्यासाठी (QRSAM)लाँच केले आहे. भारतीय लष्कर आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज क्विक रिअॅक्शन सरफेस टू एअर मिसाईल (QRSAM) ची यशस्वी चाचणी घेतली. या आढाव्यादरम्यान लांब पल्ल्याची मध्यम उंची, लहान श्रेणी, उच्च उंचीवर चालणारे लक्ष्य, कमी रडार स्वाक्षरी, लक्ष्य ओलांडणे आणि एकामागून एक दोन क्षेपणास्त्रे डागून टिकून राहणे आणि लक्ष्य नष्ट करणे. ही चाचणी दिवसा आणि रात्री अशा दोन्ही परिस्थितीत घेण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.