ETV Bharat / bharat

संतापजनक! व्यसनासाठी दिले नाही पैसे; मुलाने केली आई-वडिलांची हत्या - खूंटी डबल मर्डर

मिळालेल्या माहितीनुसार, व्यसनासाठी घरुन पैसे मिळत नसल्याने रागाच्या भरात रामकुमारने हे कृत्य केले. नशेतच घरी आलेल्या आरोपीने आई-वडिलांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती. हे भांडण इतके वाढले, की त्याने लाकडी दांडक्याने आई-वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यातच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

double-murder-in-khunti-son-killed-his-mother-and-father
संतापजनक! व्यसनासाठी दिले नाही पैसे; मुलाने केली आई-वडिलांची हत्या
author img

By

Published : Jun 9, 2021, 7:39 PM IST

रांची : झारखंडच्या खूंटी जिल्ह्यामध्ये एका संतापजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या वृद्ध आई-वडिलांना मारहाण करुन, त्यांची हत्या केली आहे. राजेंद्र महतो आणि पिटालिया देवी असे या दुर्दैवी दाम्पत्याचे नाव आहे. तर, रामकुमार महतो असे त्यांच्या नराधम मुलाचे नाव आहे.

रागाच्या भरात आई-वडिलांची हत्या..

या प्रकरणाची माहिती मिळताच खूंटी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मृतदेहांना ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी सदर रुग्णालयात पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार, व्यसनासाठी घरुन पैसे मिळत नसल्याने रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. नशेतच घरी आलेल्या आरोपीने आई-वडिलांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती. हे भांडण इतके वाढले, की त्याने लाकडी दांडक्याने आई-वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यातच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी रामकुमार हा फरार झाला आहे. पोलीस सध्या त्याचा तपास करत आहेत.

व्यसनासाठी दिले नाही पैसे; मुलाने केली आई-वडिलांची हत्या

यापूर्वीही केलीये तुरुंगवारी..

स्थानिकांनी सांगितले, की रामकुमार नेहमीच आपल्या आईवडिलांसोबत भांडणे करायचा. राजेंद्र यांनी आपल्या मुलाविरुद्धच पोलीस तक्रारही केली होती; ज्यानंतर रामकुमार तुरुंगवारी करुन आला होता. मात्र, तुरुंगात जाऊन आल्यानंतरही त्याचा स्वभाव तसाच होता. त्याची पत्नीही त्याला वैतागून आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली होती, असे राजेंद्र यांच्या दुसऱ्या मुलाने सांगितले. रामकुमारने आपल्या वाट्याची जमीनही विकून टाकली होती, असेही त्याने सांगितले.

हेही वाचा : 'लिव्ह-इन रिलेशनशिप' हा गुन्हा नाही; पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्वाळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.