ETV Bharat / bharat

Diwali Padwa 2023 : दिवाळी पाडवा 2023; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Diwali Padwa 2023 : दिवाळीत पाडव्याला विशेष महत्व असतं. यंदाच्या वर्षी दिवाळी पाडव्याचे शुभ मुहूर्त काय आणि महत्त्व जाणून घेऊया…

Diwali Padwa 2023
दिवाळी पाडवा 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 11:49 AM IST

Updated : Nov 14, 2023, 6:38 AM IST

हैदराबाद : Diwali Padwa 2023 : दिवाळी सण उत्साहात सुरू आहे. दिवाळी दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. तसेच हा वर्षातील सर्वात मोठा सणही मानला जातो. हिंदू धर्मातही दिवाळी सणाला अतिशय महत्वाचं स्थान आहे. या सणाची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नापासून होते. यात दिवाळी पाडव्याला विशेष महत्व असतं. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशी या दिवाळी पाडव्याची ओळख आहे. लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा साजरा केला जातो. शुभ मुहूर्त काय आणि महत्त्व जाणून घेऊयात…

दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त : १४ नोव्हेंबर – सकाळी ६ वाजून १४ मिनिटे ते सायंकाळी ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे.

  • तिथी – शु. प्रतिपदा १४.३६
  • नक्षत्र – अनुराधा २७.२३
  • योग – शोभन १३.५५
  • करण – बालव २६.१५

दिवाळी पाडवा : पाच दिवसांच्या दिवाळी सणाची सुरुवात वसुबारसपासून सुरू होते. दिवाळी भाऊबीजेच्या दिवशी संपते. दिवाळीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा असतो. यंदा १४ नोव्हेंबरला मंगळवारी दिवाळी पाडवा आहे. या शुभदिनी सोनं किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. तसेच अनेक व्यापारी दिवाळी पाडव्यानिमित्त आपल्या जमाखर्चाच्या वह्या, पेन अशा अनेक वस्तूंची पूजा करतात. व्यापारी या दिवसापासून आपले नवीन व्यापारी वर्ष सुरू करतात. याला विक्रमसंवत्सर असं म्हटलं जातं. याशिवाय सुवासिनींकडून पतीची ओवाळणी केली जाते. यामुळे दोघांना दीर्घयुष्य लाभते, अशी श्रद्धा आहे. लग्नानंतर नवविवाहित जोडप्यांपैकी नवरदेवाला सासरच्या मंडळींकडून खास आमंत्रित करण्यात येते, त्यांच्यासाठी खास स्वादिष्ट जेवण केले जाते. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

बलिप्रतिपदेची पूजा : दिवाळी पाडव्याच्याच दिवशी बलिप्रतिपदा पूजेला विशेष महत्व असते. बलिप्रतिपदेतील बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. त्याच्याकडून तीन पावले जमीन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने त्याला मारले. पण हा राजा जनतेची खूप काळजी घ्यायचा. म्हणून ग्रामीण भागात आजही अनेक महिला भावाला ओवाळताना “ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” अशी म्हण म्हणताना दिसतात.

हेही वाचा :

  1. Diwali 2023 home decor tips : दिवाळीत असं सजवा घर; जाणून घ्या टिप्स
  2. Diwali 2023 : यंदाच्या दिवाळीत बच्चे कंपनीमध्ये 'फटाके रॅपर चॉकलेट'ची क्रेज
  3. Diwali 2023 : या दिवाळीत मिठाई खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी

Last Updated : Nov 14, 2023, 6:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.