ETV Bharat / bharat

Diwali Celebration : गोवर्धन पूजेची परंपरा कशी सुरु झाली, जाणून घ्या पूजेमागची कथा - learn how tradition of govardhan Puja started

दिवाळीत (Diwali Celebration) गोवर्धन पूजा (Govardhan Puja) ही अन्नकूट उत्सव म्हणून देखील साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाने आपल्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून भगवान इंद्राचा पराभव केला होता आणि ही पूजा त्याच उत्सवाप्रीत्यर्थ (tradition of govardhan Puja started) केली जाते. यावर्षी भाऊबिजेच्या दिवशीच म्हणजे 26 ऑक्टोंबर, बुधवार रोजी गोवर्धन पुजा केली जाईल. (story behind worship of cows and bulls)

Diwali Celebration
गोवर्धन पूजा
author img

By

Published : Oct 11, 2022, 5:28 PM IST

दिवाळीत (Diwali Celebration) गोवर्धन पूजा (Govardhan Puja) ही अन्नकूट उत्सव म्हणून देखील साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाने आपल्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून भगवान इंद्राचा पराभव केला होता. ही पूजा त्याच उत्सवाप्रीत्यर्थ (tradition of govardhan Puja started) केली जाते. ही पूजा भगवान श्रीकृष्णाच्या अवतारानंतर द्वापर युगापासून सुरू झाली, असे म्हणतात. हा उत्सव ब्रजवासीयांचा मुख्य सण (story behind worship of cows and bulls) मानला जातो. या दिवशी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ परमेश्वराला अर्पण केले जातात.

पूजा- विधी : गोवर्धन पूजनाच्या दिवशी बळी पूजा, मार्गपाळी इत्यादी सणही साजरे केले जातात. तसेच या दिवशी गाय, बैल आणि इतर जनावरांना अंघोळ घालून धूप, चंदन व फुलांचा हार घातला जातो. गोमातेला मिठाई भरवल्यानंतर तिची पूजा केली जाते आणि नंतर श्रीकृष्णाची पूजा केली जाते.

गाईची पूजा : शेणापासून गोवर्धन (story behind worship of cows and bulls) पर्वताची प्रतिकृती बनवली जाते. श्रीकृष्णासमोर एक गाय, तांदूळ, फुले, पाणी, दही आणि तेलाचे दीप प्रज्वलित केले जातात आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते आणि नंतर कृष्णाला प्रदक्षिणा घातली जाते. भगवान श्री क्रिष्ण सदैव गाईंच्या गोळख्यात राहत असे. तसेच, क्रिष्णाची पवित्र गाय म्हणुन तिची महती हिंदू धर्मात पूज्यनिय आहे. म्हणुन या दिवशी गाईंची देखील पूजा केली जाते.

म्हणून केली जाते गोवर्धन पूजा साजरी : श्रीकृष्णाने ब्रजवासीयांना मुसळधार पावसापासून वाचवण्यासाठी सलग सात दिवस गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळीवर उचलून धरले होते. सुदर्शन चक्राच्या प्रभावामुळे ब्रजवासीयांवर पाण्याचा एकही थेंब पडला नव्हता. तेव्हा ब्रह्माजींनी इंद्र देवाला सांगितले की, पृथ्वीवर कृष्णाचा जन्म झाला आहे आणि त्याच्याशी वैर धरणे योग्य नाही. श्रीकृष्णाचा अवतार जाणून घेतल्यावर इंद्रदेव यांना त्यांच्या कार्याची लाज वाटली आणि त्यांनी श्रीकृष्णाची माफी मागितली. सातव्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत खाली ठेवला तेव्हा ग्रामस्थांनी आनंदाने व सन्मानार्थ अन्नकूट साजरे केले. मग त्यांनी भगवंतासाठी भोग आणि नैवेद्य केले आणि 'छप्पन भोग' लावून त्यांना भोजन दिले होते.

अन्नकूट उत्सव साजरा करण्याचे महत्त्व : अन्नकूट उत्सव साजरे केल्यास माणूस दीर्घ आयुष्य व आरोग्य मिळवतो आणि दारिद्र्याचा नाश होऊन, माणूस आयुष्यभर सुखी आणि समृद्ध राहतो. असे मानले जाते की, या उत्सवाच्या दिवशी जो दुःखी राहतो तो आयुष्यभर दुःखी राहतो. म्हणून श्रीकृष्णाला प्रिय असणारा अन्नाकूट उत्सव हा अत्यंत प्रेमाने आणि आनंदात साजरा करावा.

गोवर्धन पूजा 2022 मुहूर्त : हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा तिथी 25 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 4:18 वाजता सुरू होईल आणि प्रतिपदा तिथी दुसऱ्या दिवशी 26 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 02:42 वाजता समाप्त होईल. गोवर्धन पूजा मुहूर्त 26 ऑक्टोबर, बुधवार रोजी सकाळी 06.33 मिनीटांनी सुरु होईल. आणि सकाळी 08.48 मिनीटांनी संपेल. पूजा मुहूर्ताचा कालावधी 2 तास 15 मिनिटे राहील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.