नवी दिल्ली : इच्छामरण भारतात अजूनही मान्यता नाही. यापूर्वी शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून सरकारकडे इच्छामरणाची मागणी केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता दिल्लीतून एक विचित्र बातमी समोर आलीय. येथे एका कुटुंबाने राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केलीय. मात्र यामागचं कारण अत्यंत धक्कादायक आहे.
गुंडाच्या जाचाला कंटाळून इच्छामरणाची मागणी : ईशान्य दिल्लीतील मनोज सिंघल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपल्या कुटुंबासह इच्छामरणाची मागणी केलीय. मनोज सिंघल ज्या इमारतीत राहतात, त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारा एक व्यक्ती त्यांच्या घरावर लक्ष ठेवून आहे. ठाकूर विजयपाल सिंह असे त्यांचे नाव आहे. पीडित मनोज सिंघल यांनी आरोप केलाय की, विजयपाल रोज त्यांचा छळ करतो. एवढेच नाही तर त्याने मनोज सिंघल यांच्यावर उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्याचा संबंध माफियांशी आहे, जे मनोज यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देतात. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करूनही मनोज सिंघल यांना मदत मिळालेली नाही.
पोलीसही मदत करत नसल्याचा आरोप : या जाचामुळे आता मनोज सिंघल यांनी राष्ट्रपतींकडे कुटुंबासह इच्छामरणाची मागणी केलीय. गुंडांच्या भीतीमुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाला भीतीने जगावे लागत आहे. न्यायासाठी आम्ही वारंवार पोलिसांकडे याचना करत आहोत. मात्र पोलीसही आम्हाला मदत करत नसल्याचा आरोप सिंघल यांनी केलाय. या अपमानास्पद जीवनापेक्षा मरण बरे, असे ते म्हणाले.
इच्छामरण भारतात बेकायदेशीर आहे. इथे संविधानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे, जीवन संपवण्याचा अधिकार नाही. जर एखाद्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कलम 309 लावले जाते. जर एखाद्या व्यक्तीला अत्यंत असह्य आजार असेल तर अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय इच्छामरणाच्या मागणीवर विचार करू शकते. - मनीष भदोरिया, वकील
या देशांमध्ये इच्छामरण कायदेशीर : भारतात जरी इच्छामरण बेकायदेशीर असले तरी जगातील काही देशांमध्ये ते कायदेशीर आहे. पोर्तुगाल, बेल्जियम, कॅनडा, कोलंबिया, लक्झेंबर्ग, नेदरलँड, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, उरुग्वे या देशांमध्ये आणि अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यात इच्छामरण कायदेशीर आहे. पोर्तुगालच्या संसदेने तीन महिन्यांपूर्वीच इच्छामरणाला मंजुरी दिलीय. पोर्तुगालमध्ये १८ वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती इच्छामरणासाठी विचारू शकते. इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देणारा नेदरलँड हा जगातील पहिला देश आहे. येथे 2002 पासून इच्छामरण कायदेशीर आहे.
- स्वित्झर्लंडमध्ये परदेशी व्यक्तीलाही कायदेशीररित्या इच्छामरण मिळू शकते. इथे स्वतःचा जीव घेणे गुन्हा नाही. जगातील पहिले सुसाईड मशीनही येथे बनवण्यात आलंय. त्यामुळे अनेक लोक स्वित्झर्लंडला आत्महत्या करण्यासाठी जातात.
- ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात इच्छामरणाचा कायदा गंभीर आजारांनी ग्रस्त किंवा मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींना लागू आहे.
हेही वाचा :