नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियाने या वर्षाच्या अखेरीस विद्यमान मुक्त व्यापार कराराचा विस्तार करण्यासाठी सुरू असलेली चर्चा पूर्ण करण्यासाठी शनिवारी वचनबद्धता व्यक्त केली. दोन्ही देशांनी पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष डॉन फॅरेल यांच्यात झालेल्या संयुक्त मंत्रिस्तरीय आयोगाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर : भारताच्या दौऱ्यावर असलेले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत फॅरेल आले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षी 29 डिसेंबर रोजी आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार लागू केला आणि आता सर्वसमावेशक आर्थिक सहकार्यासाठी तयार आहेत असे मनूद केले. सीईसीए कराराच्या विस्तारासाठी बोलणी चालू आहेत. 10 मार्च रोजी येथे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर झालेल्या पहिल्या भारत-ऑस्ट्रेलिया शिखर परिषदेनंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी वक्तव वक्तव्य केले. यात त्यांनी म्हटले की, दोन्ही देश 2023 पर्यंत महत्त्वाकांक्षी सीईसीए करार मजबूत करण्याचा विचार करत आहेत. दोन्ही पंतप्रधानांनी पुढील तीन महिन्यांत स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी व्यवस्था (MMPA) त्वरीत पूर्ण करण्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे एका संयुक्त निवेदनात नमूद करत स्पष्ट केले आहे.
कराराचा पहिला टप्पा : ईसीटीए हा आमच्या आर्थिक कराराचा पहिला टप्पा आहे. आम्ही आता आमच्या चर्चेच्या दुसर्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. जिथे आम्ही विषयांची विस्तृत श्रेणी पाहत आहोत. असे पीयूश गोयल यांनी सांगितले. पीयूश गोयल यांनी शनिवारी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या महत्त्वाच्या खनिजांवर भारत ऑस्ट्रेलियाशी चर्चा करत आहे. ते पुढे म्हणाले की, भारतात महत्त्वाच्या खनिजांचा अभाव आहे. ज्याचा वापर बॅटरी बनवण्यासाठी केला जातो आणि ऑस्ट्रेलियाकडे त्या खनिजांचा प्रचंड साठा आहे. सध्या अनेक देश ऑस्ट्रेलियातून ही खनिजे आयात करून त्यांचे उत्पादन युनिट विकसित करत आहेत.
हेही वाचा : Modi invited in kapil sharma show : कपिल शर्मा शोमध्ये पीएम मोदींना आमंत्रण; म्हणाले...