ETV Bharat / bharat

Soldier death Shiachin Glacier ऑपरेशन मेघदूतमध्ये धुळ्याच्या जवानाला वीरमरण - Dhule soldier death in Operation Meghdoot

धुळ्याच्या जवानाला शियाचीन ग्लेशियर Dhule soldier death Shiachin Glacier याठिकाणी ऑपरेशन मेघदूतमध्ये Dhule Jawan Operation Meghdoot सेवा बजावत असताना प्रकृती खालावल्याने वीरमरण Dhule soldier heroic death Shiachin आल्याची घटना घडली आहे. धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील रहिवाशी मनोहर रामचंद्र पाटील (वय ४२ वर्षे) असे मृत सैनिकाचे नाव आहे.

ऑपरेशन मेघदूतमध्ये सेवा बजावत असताना प्रकृती खालावली; धुळ्याच्या जवानाला वीरमरण

author img

By

Published : Sep 6, 2022, 4:03 PM IST

धुळे : धुळ्याच्या जवानाला शियाचीन ग्लेशियर Dhule soldier death Shiachin Glacier याठिकाणी ऑपरेशन मेघदूतमध्ये Dhule Jawan Operation Meghdoot सेवा बजावत असताना प्रकृती खालावल्याने वीरमरण Dhule soldier heroic death Shiachin आल्याची घटना घडली आहे. धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील रहिवाशी मनोहर रामचंद्र पाटील (वय ४२ वर्षे) असे मृत सैनिकाचे नाव आहे. मनोहर भारतीय सैन्य दलात ९ जानेवारी २००२ मध्ये भरती झाले होते.

अचानक बिघडली प्रकृती - शियाचीन ग्लेशियर याठिकाणी ऑपरेशन मेघदूतमध्ये सेवा बजावत असताना १६ जुलै २०२२ या दिवशी मनोहर यांची प्रकृती खालावली. तेथील हवामानाच्या दुष्परिणामांमुळे त्यांना तीव्र डोकेदुखी, उलटीचा त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारार्थ त्यांना हेलिकॉप्टरने ४०३ फिल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरू असताना जवान मनोहर रामचंद्र पाटील यांची ५ सप्टेंबरच्या सायंकाळी ५:२२ वाजता प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव आज ( ६ सप्टेंबर ) हवाई मार्गे पुणे येथे तेथून रुग्णवाहिकेतून त्यांच्या गावी न्याहळोद येथे आणण्यात येत आहे. वीरमरण आलेल्या मनोहर रामचंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक नऊ वर्षाची मुलगी, आई,वडील, चार भाऊ असा परिवार आहे.

उपचारार्थ रुग्णालयात दाखल, मात्र तरीही झाला मृत्यू - सध्या मनोहर हे फिल्ड वर्कशॉप येथे भारतीय सैन्यात अत्यंत थंडीचे ठिकाण समजले जाणाऱ्या सियाचिन ग्लेशियर या ठिकाणी ऑपरेशन मेघदूतमध्ये सेवा देत होते. १६ जुलै रोजी तेथील हवामानातील दुष्परिणामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या गोठल्या. त्यामुळे त्यांना तीव्र डोकेदुखी आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याच दिवशी त्यांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेर काल त्यांचा मृत्यू झाला.

धुळे जिल्ह्यावर शोककळा - हुतात्मा मनोहर पाटील यांचे पार्थिव आज हवाई मार्गाने पुणे येथील हवाई अड्ड्यावर आणण्यात येईल. येथून शासकीय रुग्णवाहिकेद्वारे धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मनोहर पाटील यांच्या पश्चात त्यांची पत्नी मायाबाई पाटील तसेच ९ वर्षांची मुलगी, आई, वडील व चार भाऊ असा परिवार आहे. हुतात्मा जवान मनोहर पाटील हुतात्मा झाल्याचे वृत्त धुळे तालुक्यात येऊन धडकल्याने धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.

काय आहे सियाचीन ग्लेशियर ?
सियाचीन ग्लेशियरवर भारताचे पाकिस्तानशी युद्ध झाले. येथील सातत्याने बदलणारे हवामान आणि धोकादायक परिस्थितीमुळे ते जगातील सर्वांत कठीण ठिकाणांपैकी एक बनले आहे. सियाचीन हे जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणून ओळखले जाते. मात्र, भारत-पाक नियंत्रण रेषेवर असलेल्या या भागालाही नैसर्गिक इतिहास आहे. सामरिकदृष्ट्या ते भारत आणि पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचे आहे. सियाचीन हे समुद्रसपाटीपासून ५७५३ मीटर उंचीवर आहे. काश्मीरच्या या भागावरूनही भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद आहे. दोन्ही देशांचे सैन्य येथे तैनात आहे.

भारत-पाक सैनिकांचा सियाचीनमध्ये मृत्यू - सियाचीन हे भारतातील सर्वांत उंच आणि येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाची हिमनदी असल्याचे म्हटले जाते. हे बर्फाळ वाळवंटासारखे दिसते. जिथं आयुष्य जगणं अजून अवघड आहे. सर्वत्र बर्फ आहे. येथील बर्फात गाडून भारत आणि पाकिस्तानच्या अनेक सैनिकांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत. म्हणूनच या अत्यंत महत्त्वाच्या हिमनदीला मृत्यूची दरी असेही म्हणतात. सियाचीनच्या एका बाजूला पाकिस्तानची सीमा आहे तर दुसऱ्या बाजूला चीनची सीमा आहे. या दोन देशांवर लक्ष ठेवण्यासाठी भारताने आपले सैन्य या प्रदेशात तैनात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.