Dhirendra Shastri Challenges To ANS : धीरेंद्र शास्त्री यांचे अंनिसच्या आव्हानकर्त्यांना निमंत्रण; म्हणाले, तर उद्या दरबारात या - धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आव्हान
शुक्रवारी रायपूर येथे बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दिव्य दरबार भरला होता. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते त्यांचे चमत्कार पहायला दरबारात पोहोचले नाही. महाराज वारंवार मंचावरून आव्हानकर्त्यांना प्रतिआव्हान देताना दिसत होते. जे आज येऊ शकले नाहीत त्यांनी उद्या दरबारात यावे, असेही ते म्हणाले.
रायपूर (छत्तीसगड) : रायपूर येथील बागेश्वर धाम महाराजांच्या दिव्य दरबारात धीरेंद्र महाराज यांनी मंचावरून घोषणा केली. ते म्हणाले की, आव्हानकर्त्यांनी आजच या दिव्य दरबारात यावे. येथे कोणतेही टोकन किंवा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हा खुला दरबार आहे. इथे कोणीही येऊ शकते. कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी मंचावर आव्हानकर्त्यांना वारंवार आमंत्रित केले, परंतु कोणीही त्यांचे निमंत्रण स्वीकारले नाही.
हनुमान चालिसाचा उपाय सांगणे ही कोणती अंधश्रद्धा ? धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, "आज दिव्य दरबार होत आहे, तो उद्या आणि परवाही होईल. ज्यांनी नागपुरात आव्हान दिले ते येऊ शकतात. या दैवी दरबारात मी त्यांचे आव्हान स्वीकारत आहे. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की “भारतात कोणीही सनातनसमोर टिकू शकत नाही, आम्ही इंग्रजांची खिल्ली उडवली. नागपुरात रामकथा 7 दिवसांची होती. त्यांनी असा भ्रम पसरवला की, त्यांनी आव्हान दिले मग आम्ही पळून गेलो. आम्ही अंनिसच्या लोकांना रायपूरला या असे आव्हान दिले होते. तुम्ही आला असाल तर पुढे या, आम्हाला आमच्या देवावर विश्वास आहे आम्ही तुम्हाला ओले करून पाठवू. आम्ही दक्षिणा घेत नसेल तर मग यात अंधश्रद्धा कुठे आहे? हनुमान चालिसाचा उपाय सांगणे ही कोणती अंधश्रद्धा आहे, असा प्रश्न धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांनी विचारला.
“आ जाओ दरबार में पनीर भी खिलाएंगे”: धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, “ज्यांनी आव्हान दिले होते ते आज येऊ शकत नसाल तर उद्या या. मग मी पळून गेलो असे म्हणू नका. या गर्दीच्या दरबारात ज्यांनी आम्हाला आव्हान दिले त्यांचे आव्हान आम्ही स्वीकारतो. आव्हानकर्त्यांचा खर्च मी देईल. त्यांना पनीर करी पण खायला देईन, दोन मिरच्या पण खायला देईन."