ETV Bharat / bharat

'धन कुबेर' धीरज साहू यांचे राहुल गांधींशी खास संबंध, जाणून घ्या कसे - धीरज प्रसाद साहू राहुल गांधी

Dhiraj Prasad Sahu : आयकर छाप्यांमध्ये काँग्रेस नेते धीरज साहू यांच्याकडून ३५० कोटींहून अधिक रोख जप्त झाली आहे. हे राहुल गांधी यांचे मोठे चाहते आहेत. तसेच त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशीही जवळचे संबंध आहेत.

Dhiraj Prasad Sahu
Dhiraj Prasad Sahu
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 8:46 PM IST

Updated : Dec 11, 2023, 8:55 PM IST

रांची : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांना आता कोणत्याही परिचयाची गरज नाही. ते देशात 'धन कुबेर' नावानं प्रसिद्ध झाले आहेत. याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे सापडलेला नोटांचा गडगंज साठा.

३५० कोटींहून अधिक रोख जप्त : मूळचे लोहरदगा येथील धीरज प्रसाद साहू यांच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय देशी दारूशी संबंधित आहे. ओडिशाच्या सुंदरगढ, बोलंगीर, बौध आणि संबलपूर येथे ६ डिसेंबर रोजी आयकर छाप्यांमध्ये ३५० कोटींहून अधिक रोख जप्त झाल्यानंतर त्यांचा पक्ष बॅकफूटवर आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इतक्या गंभीर विषयावर मौन का धारण केलंय, असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत.

Dhiraj Prasad Sahu
राहुल गांधींसोबत धीरज साहू

धीरज प्रसाद साहू राहुल गांधींचे मोठे चाहते : भ्रष्टाचाराच्या एवढ्या मोठ्या खुलाशानंतर राहुल गांधींच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धीरज साहू यांचं 'X' हँडल तपासल्यानंतर ते राहुल गांधींचे मोठे चाहते असल्याचं स्पष्ट होतं. त्यांनी आतापर्यंत केलेल्या पोस्ट्सपैकी बहुतांश पोस्ट राहुल गांधी यांच्याशी संबंधित आहेत. राहुल गांधींच्या भाषणाचा प्रत्येक भाग ते आपल्या प्रतिक्रियांसह पोस्ट करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतचा फोटोही पोस्ट केला होता. यावरून काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये त्यांचा किती प्रभाव आहे, हे दिसून येतं. मात्र आता त्यांच्या 'X' हँडलवरून अशा अनेक पोस्ट हटवण्यात आल्या आहेत.

Dhiraj Prasad Sahu
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत धीरज साहू

भ्रष्टाचाराविरुद्धची पोस्ट हटवली : धीरज प्रसाद साहू यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध 'X' वर लिहिलेली पोस्ट हटवल्यानं ते आणखी वादात सापडले आहेत. त्यांनी १२ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "नोटाबंदीनंतरही देशातील इतका काळा पैसा आणि भ्रष्टाचार पाहून मन व्यथित होतं. लोकांचा इतका काळा पैसा कुठून जमा होतो हे समजत नाही. देशातून भ्रष्टाचार जर कोणी उखडून काढू शकत असेल तर तो फक्त काँग्रेस पक्ष आहे". मात्र धीरज साहू यांना कदाचित समजलं नसेल की त्यांच्या पोस्टचा स्क्रीन शॉट घेण्यात आला आहे. भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्या पोस्टचा स्क्रीन शॉट शेअर करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Dhiraj Prasad Sahu
काळ्या पैशाबाबत सोशल मीडियावर पोस्ट, नंतर डिलीट केली

धीरज साहू यांना शूटींगची आवड : लोहरदगा येथे धीरज साहू यांची ओळख त्या भागातील राजाप्रमाणे आहे. तेथे सर्व त्यांना धीरज बाबू म्हणून ओळखतात. आपल्या क्षेत्रात खेळांचा विकास करण्याकडे त्यांचा विशेष जोर आहे. २८ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांनी लोहरदगा जिल्हा शूटिंग क्लबचं उद्घाटन केलं होतं. त्यांचे नेम धरतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतील.

खेळांच्या माध्यमातून राजनीती करतात : धीरज साहू असे राजकारणी आहेत, जे खेळांच्या माध्यमातून राजनीती करण्याचा प्रयत्न करतात. चतरा लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडणूक हरल्यानंतरही त्यांनी यावेळी पुन्हा एकदा येथे आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. याच महिन्यात त्यांनी चतरा येथील जवाहन लाल नेहरू स्टेडियमवर मोहन बागान आणि कोलकाता इलेव्हन यांच्यात फुटबॉल सामना आयोजित करण्याची तयारी केली होती. यासाठी त्यांनी १ डिसेंबर रोजी स्टेडियमची पाहणीही केली होती. मात्र, दरम्यानच्या काळात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे.

हे वाचलंत का :

  1. उच्चशिक्षित हिंदुत्ववादी गडगंज संपत्तीचे मालक, कोण आहेत मध्य प्रदेशचे होणारे मुख्यमंत्री मोहन यादव

Last Updated : Dec 11, 2023, 8:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.