भोपाळ - शेतात आदिवासी कुटुंबातील पाच जणांचे सांगाडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. 8-10 फूट खड्डा खोदून मृतदेह शेतात पुरले होते. मध्यप्रदेशातील देवास जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नेमावारमध्ये ही भंयकर घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाच सदस्य गेल्या 48 दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी पोलिसांनी 4 ते 5 जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी जेसीबीने खोदून मृतदेह बाहेर काढले आहेत. 13 मे रोजी रात्री नेमावारमधून आदिवासी कुटुंबातील पाच सदस्य बेपत्ता झाले होते. यात चार महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह मंगळवारी सुरेंद्र ठाकूर यांच्या शेतात सापडले. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आदिवासी कुटुंबाचा शोध घेण्याची आदिवासी संघटनांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. अलीकडेच पोलिसांनी बेपत्ता लोकांची माहिती देणाऱयास बक्षीस जाहीर केले होते.
भोपाळमध्ये महिलीची हत्या -
भोपाळमध्ये एका महिलेच्या हत्येचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेचा मृतदेह घराच्या बाथरूममध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला. महिलेचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता असून संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. गळ्याभोवती वायर घट्ट आवळल्याने मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर पती फरार असून त्याच्यावर खुनाचा संशय आहे.
हेही वाचा - मेहूणी- जावयाच्या वादातून घडले ५ जणांचे हत्याकांड, आधी कुटुंबीयांना भोसकले, नंतर मेहूणी-सासूची हत्या
हेही वाचा - नागपूर हादरले!!! पत्नी, मुलगा, मुलगी, सासू आणि मेहुणीला भोसकून आलोक माटूरकरने घेतला गळफास