नवी दिल्ली/पणजी- गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपली असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोवा राज्याचे भाजप निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत गोवा विधानसभा निवडणुकीबाबत शाह यांच्याकडून मार्गदर्शन घेतल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबाबतचे ट्विट गोवा राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की आमचे नेते अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी थोडक्यात माहिती दिली. गोवा विधानसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन घेतले आहे. अमित शाह यांनी महाराष्ट्रातील पावसाची आणि विशेषत: मराठवाड्यातील पुरस्थितीची सविस्त माहिती जाणून घेतली. यावेळी गोव्याचे मंत्री मायकेल लोबोदेखील उपस्थित होते.
-
Met our leader, Hon Union HM @AmitShah ji to brief and to seek guidance for #GoaAssemblyElections in New Delhi yesterday. Goa Minister @MichaelLobo76 too joined.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 30, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Hon Amit Bhai also took detailed information on recent #MaharashtraRains & flood situation especially in Marathwada. pic.twitter.com/Xh9HSH5LMb
">Met our leader, Hon Union HM @AmitShah ji to brief and to seek guidance for #GoaAssemblyElections in New Delhi yesterday. Goa Minister @MichaelLobo76 too joined.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 30, 2021
Hon Amit Bhai also took detailed information on recent #MaharashtraRains & flood situation especially in Marathwada. pic.twitter.com/Xh9HSH5LMbMet our leader, Hon Union HM @AmitShah ji to brief and to seek guidance for #GoaAssemblyElections in New Delhi yesterday. Goa Minister @MichaelLobo76 too joined.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 30, 2021
Hon Amit Bhai also took detailed information on recent #MaharashtraRains & flood situation especially in Marathwada. pic.twitter.com/Xh9HSH5LMb
हेही वाचा-परीक्षा वारंवार रद्द होण्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार करावा, अन्यथा..फडणवीस यांचा इशारा
देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजपचे राष्ट्रीय जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. या भेटीत विविध विषयांसह गोवा विधानसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन घेतल्याचे भाजप नेते फडणवीस यांनी ट्विट केले होते.
हेही वाचा-देवेंद्र फडणवीस आजपासून गोवा दौऱ्यावर; काँग्रेस, आप नेतेही लागले निवडणूक तयारीला
गोवामध्ये राजकीय हालचालींना वेग-
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्र गोमंतक पक्षासह सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राज्याच्या राजकारणातील नवखी आम आदमी पार्टी (आप) या सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गोव्याकडे मोर्चा वळवला आहे. शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी विधानसभेच्या 22 जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे बुधवारी जाहीर केले आहे.
हेही वाचा-...म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
फडणवीस यांच्याकडे आहे निवडणुकीची धुरा
महाराष्ट्रातील २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळवून देणारे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे निवडणूक प्रभारी म्हणून भाजपने जबाबदारी सोपविली आहे. महाराष्ट्रप्रमाणे गोव्यातही फडणवीस भाजपला सर्वाधिक जागा जिंकून देण्यासाठी मनसुबे आखतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला होता. नुकतीच त्यांनी फडणवीस यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यापूर्वी फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री किशन रेड्डी, दर्शन जर्दोश आणि गोव्याचे प्रभारी सी टी रवी हे राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री ,आमदार, विविध प्रभाग समिती व पदाधिकारी यांच्याशी निवडणुकीविषयी चर्चा व मार्गदर्शन केले.