पणजी - गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा ( Goa Election Result Date ) निकाल १० मार्चला लागणार आहे. ४० जागांसाठी झालेल्या या मतदान प्रक्रियेत ३०१ उमेदवारांनी भाग्य अजमावले. 78.94 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत आपला कौल दिला आहे. गोव्यात काय होणार सत्ता पुन्हा कोणाच्या ताब्यात जाणार आणि मुख्यमंत्री कोण होणार हा सध्या चर्चेचा विषय आहे. मात्र गोव्यातील अतिशय महत्त्वाची निवडणूक असलेला मतदार संघ म्हणजे सांकेलीम हा आहे. कारणकी याठिकाणाहून लढत आहेत गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार डॉक्टर प्रमोद सावंत ( Chief Minister Dr. Pramod Sawant ). 20 पेक्षा जास्त जागा मिळून आम्ही पुन्हा सरकार स्थापन करणारच असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. आम्ही स्पष्ट बहुमत मिळवू आणि कोणाच्याही मदतीशिवाय सरकार स्थापन करू, असा त्यांचा दावा आहे.
डाॅ. प्रमोद सावंत यांनी विजयाचा विश्वास केला व्यक्त -
विधानसभेच्या गेल्या निवडणूकीत 2017 साली भाजपाने निवडणूक हरुनही सत्ता मिळवली. त्यानंतर भाजपचा चेहरा बदलला 2019 मध्ये मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर तो अजून बदलला. काॅंग्रेस मधुन आलेल्या अर्ध्याहून आधिक आमदारांच्या जोरावर भाजपने सत्ता मिळवली. यावेळी पाच राज्यात झालेल्या निवडणुकांकडे 2024 च्या लोकसभेची रंगीत तालीम म्हणुन पाहीले जात आहे. यातच गोव्याच्या निवडणुकीत भाजप काॅंग्रेस आणि तेथील स्थानिक अघाड्यांशिवाय ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काॅंग्रेस अरविंद केजरीवाल यांच्या 'आप' पक्षाने गोव्यात आव्हान उभा केले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेना अशा इतर पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले आहेत. यातच भाजपने तिकीट नाकारल्या मुळे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांनी पणजी तुन अपक्ष निवडणूक लढवली शिवसेने सह इतर पक्षांनी त्यांना उघड पाठिंबा दिला तसेच भाजप सरकार मधे कॅबिनेट मंत्री असलेले मायकल लोबो यांनी निवडणुकांच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देत काॅंग्रेसला जवळ केले अशा आव्हानांनंतरही डाॅ. प्रमोद सावंत यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
प्रमोद सावंत यांची माहिती -
डाॅ. प्रमोद सावंत हे मनोहर पर्रीकर यांच्या निधना नंंतर मुख्यमंत्री झाले. सांकेलीम मतदार संघातून नशिब अजमावत आहेत. सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी पांडुरंग आणि पद्मिनी सावंत यांच्या पोटी झाला. त्यांनी कोल्हापुरातील गंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयातून आयुर्वेद, वैद्यक आणि शस्त्रक्रियेची पदवी आणि पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून सामाजिक कार्याची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
गोवा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड -
सावंत यांनी 2008 च्या पाले मतदारसंघाची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर लढवली त्यांना काँग्रेसच्या प्रताप प्रभाकर गौण यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. 2012 ची विधानसभा निवडणूक त्यांनी सांकेलीम मतदारसंघातून लढवली. त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रताप प्रभाकर गौण यांचा पराभव करत 14,255 म्हणजे 66.02% मतांनी विजय नोंदवला. त्यांनी काही काळ भारतीय जनता पक्षाच्या गोवा युनिटचे प्रवक्ते म्हणूनही काम केले. नंतर 2017 मध्ये त्याच मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या धर्मेश सगलानी यांचा त्यांनी 10,058 म्हणजे 43.04% मतांनी पराभव केला व ते गोवा विधानसभेसाठी पुन्हा निवडून आले. 22 मार्च 2017 रोजी त्यांची गोवा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री -
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची जागा रिक्त झाली. प्रमोद सावंत यांची नंतर विधानसभेने निवड केली आणि नंतर त्यांनी 19 मार्च 2019 रोजी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
पत्नी भाजप महिला मोर्चाच्या गोवा युनिटच्या अध्यक्षा -
सावंत हे मराठा समाजाचे आहेत. त्यांचे लग्न बिचोलीम येथील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात रसायनशास्त्राच्या शिक्षिका असलेल्या सुलक्षणा यांच्याशी झाले. त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत आणि सध्या भाजप महिला मोर्चाच्या गोवा युनिटच्या अध्यक्षा आहेत.
हेही वाचा : Goa Election : उत्पल पर्रीकरांमुळे पणजीत भाजपची प्रतिष्ठा पणाला