ETV Bharat / bharat

DEMONSTRATION IN NANAKHEDI VILLAGE रोहिंग्यांच्या मुलांसाठी सरकारी शाळेचे निवासी शाळेत रुपांतर, गावकरी संतापले - inaugurate school for children of rohingya

दिल्लीतील नानकहेडी गावातील माध्यमिक शाळेचे रोहिंग्या मुस्लिमांच्या मुलांसाठी निवासी शाळेत रूपांतर करण्यात आले. केजरीवाल सरकारच्या या निर्णयानंतर गावकऱ्यांमध्ये संताप आहे. शाळेच्या उद्घाटनापासून ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसले असून दिल्ली सरकारचा निषेध करत आहेत. (Demonstration in Nanakhedi Village) त्याचबरोबर भाजपनेही आप सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

DEMONSTRATION IN NANAKHEDI VILLAGE
DEMONSTRATION IN NANAKHEDI VILLAGE
author img

By

Published : Sep 9, 2022, 4:59 PM IST

नई दिल्ली बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांच्या मुलांसाठी निवासी शाळा देण्याच्या दिल्लीच्या निर्णयावरून गदारोळ झाला आहे. रोहिंग्या मुस्लिमांच्या मुलांसाठी निवासी शाळा बांधण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने दिल्लीतील नानकहेडी गावातील माध्यमिक शाळेत घेतला. गेल्या काही दिवसांपासून नानकहेडी गावातील लोक या सरकारी शाळेबाहेर बसून आंदोलन करत आहेत. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, एक आठवड्याहून अधिक काळ लोटला असून ना दिल्ली सरकारने आपला निर्णय बदलला आहे ना गावकऱ्यांचे त्याविरोधातील मनोबल कमी झाले आहे. दिल्ली सरकार आपला निर्णय बदलेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. School for Children of Rohingya in Nankhedi

रोहिंग्यांच्या मुलांना शाळेची सुविधा दिल्यावरून दिल्लीतील नानकहेडी गावातील महिला संतप्त

दिल्ली सरकारच्या या निर्णयाविरोधात महिलाही या आंदोलनात सक्रीय सहभागी झाल्या आहेत. ईटीव्ही इंडियाच्या टीमने याबाबत महिलांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, याला 10 वर्षे लागतील की 20 वर्षे माहिती नाही. पण केजरीवाल सरकार जोपर्यंत रोहिंग्यांसाठी घेतलेला निवासी शाळेचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहे. केजरीवाल सरकारचा हा निर्णय पूर्णतः चुकीचा असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे.

महिला प्रचंड संतप्त - केजरीवाल सरकारने रोहिंग्यांच्या मुलांसाठी सरकारी शाळेचे रुपांतर निवासी शाळेत करण्याचा निर्णय घेतल्यापासूुन गावातील महिला प्रचंड संतप्त झाल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, एकवेळ आम्ही मरण पत्करू, पण रोहिंग्यांना आमच्या गावात स्थाईक होऊ देणार नाही. गावातील जमीन त्यांच्या पूर्वजांची आहे आणि ती केजरीवाल यांना रोहिंग्यांसाठी वापरू देणार नाही. येथील मुलांची शाळा कंगन हेड येथे स्थलांतरित करून रोहिंग्या मुस्लिमांच्या मुलांसाठी निवासी शाळा बनविण्याच्या निर्णयावर महिला संतापल्या आहेत. त्या म्हणतात की, ही आमची जमीन केजरीवालांची नाही. गेल्या आठ दिवसांपासून येथे बसून आमचे आंदोलन सुरू आहे. मात्र आजपर्यंत त्यांचे आमदार गुलाबसिंग त्यांची विचारपूस करायलाही आलेले नाहीत.

या शाळेत आमचीच मुले शिकतील, ती बारावीपर्यंत वाढवावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रोहिंग्यांना येथे स्थायिक केल्याने गावात गुन्हेगारीच्या घटना वाढतील आणि आम्ही ते होऊ देणार नाही. गावात दवाखाना बांधा, त्यामुळे जोपर्यंत केजरीवाल त्यांचे निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत ते येथेच राहणार आहेत. 28 ऑगस्ट रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रोहिंग्या मुस्लिमांच्या मुलांसाठी शाळेचे उद्घाटन केले होते. यानंतर ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.