ETV Bharat / bharat

Youth Run 300 km within 50 Hours : तरुणाचा धावत 50 तासात 300 KM प्रवास; सैन्य भरतीची दिल्ली दरबारी मागणी - सैन्य भरतीसाठी तरुण 300 किलोमीटर धावला

राजस्थानमधील सीकर येथील एका तरुणाने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी करत असलेली मेहनत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सुरेशने धावत 50 तासात 300 किमीचा प्रवास पूर्ण (Run from Sikar to New Delhi for Army Recruitment) केला आहे. याप्रवासात तो रस्त्यावर तिरंगा झेंडा घेऊन धावत (Nagaur Youth Runs 300 km within 50 Hours) होता.

Suresh Bhinchar
सुरेश भिचर
author img

By

Published : Apr 5, 2022, 8:57 PM IST

जयपूर - राजस्थानमधील सीकर येथील एका तरुणाने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी करत असलेली मेहनत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सुरेश भिचर (Suresh Bhinchar) असे या २४ वर्षीय तरुणाचे नाव आहे. सुरेशने धावत 50 तासात 300 किमीचा प्रवास पूर्ण (Run from Sikar to New Delhi for Army Recruitment) केला आहे. याप्रवासात तो रस्त्यावर तिरंगा झेंडा घेऊन धावत (Nagaur Youth Runs 300 km within 50 Hours) होता. सुरेश भिचर 29 मार्च रोजी रात्री 9 वाजता सीकरच्या जिल्हा स्टेडियममधून निघाला आणि 2 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता दिल्लीला पोहोचला. येथे त्याने खासदार हनुमान बेनिवाल यांची भेट घेऊन सैन्य भरती लवकर घ्यावी यासाठी निवेदन दिले.

300 किमीचा प्रवास एकूण 50 तासात - सुरेशने 300 किमीचा प्रवास एकूण 50 तासात पूर्ण केला आहे. सुरेशने सांगितले की, मी 6 किमी धावणे एका तासात पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्याने हा प्रवासही तेवढ्याच वेगाने पूर्ण केला. प्रवासात गस्त घालण्यासाठी तीन मित्रही त्याच्यासोबत होते. सुरेशच्या म्हणण्यानुसार, त्याने हॉटेलमध्ये फक्त 1 दिवस जेवण केले, बाकीच्या जेवणाची व्यवस्था वेगवेगळ्या भागात नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांनी केली होती.

सुरेशची राजस्थानमध्ये चर्चा - सुरेश सीकर येथील अकादमीतून भरतीसाठीचे प्रशिक्षण घेत आहे. सैन्यात भरती होण्यासाठी तो 2015 पासून तयारी करत आहे. परंतु काही कारणास्तव त्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झाले नाही. सुरेशची धडाकेबाज शर्यत राजस्थानच्या अनेक भागात चर्चेचा विषय आहे. 2018 मध्ये नागौर येथे झालेल्या सैन्य भरतीमध्ये सुरेशने 1600 मीटरची शर्यत 4 मिनिटे 4 सेकंदात पूर्ण करून विक्रम केला होता.

Youth Runs
दिल्लीत खासदारांची घेतली भेट

बेनिवाल यांनी फेसबुकवर फोटो शेअर केले - नागौरचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी सुरेश भिचर याने सादर केलेले निवेदन आणि बैठकीचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. हनुमान बेनिवाल यांनी लिहिले की, सुरेश याने लवकरच सैन्य भरती आयोजित करण्याच्या मागणीसाठी हे निवेदन दिले आहे. मी यापूर्वीही ही मागणी मांडली होती आणि येत्या काळातही लोकसभेत सरकारसमोर मांडणार असल्याचे बेनिवाल म्हणाले.

सरकारकडून मिळाले उत्तर - सैन्य भरतीच्या आयोजनाशी संबंधित प्रकरण यापूर्वीच लोकसभा आणि राज्यसभेत घेण्यात आले आहे. त्यानंतर सरकारकडून समोर आलेल्या उत्तरात भारतीय लष्करातील भरती प्रक्रिया 2020 आणि 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती, मात्र त्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही, असे सांगण्यात आले. प्रत्युत्तरादाखल असेही सांगण्यात आले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संपला नाही. असे असतानाही परिस्थिती लक्षात घेऊन हवाई दल आणि नौदलात ऑनलाइन भरती प्रक्रिया सुरू ठेवली असून जवानांची भरती करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.