ETV Bharat / bharat

Delhi Pollution : दिल्लीत प्रदूषणाचा कहर, सरकारनं घेतला मोठा निर्णय

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 3:28 PM IST

Delhi Pollution : दिल्लीतील प्रदूषणानं आता धोक्याची पातळी गाठली आहे. रविवारी देखील एक्यूआय 'गंभीर' श्रेणीत नोंदवण्यात आला. यानंतर दिल्ली सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे.

Delhi Pollution
Delhi Pollution

नवी दिल्ली Delhi Pollution : राजधानी दिल्लीतील एक्यूआय (AQI) रविवारी सलग तिसऱ्या दिवशी 'गंभीर' श्रेणीत नोंदवण्यात आला. सध्या संपूर्ण दिल्ली गॅस चेंबरमध्ये बदलली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCP) च्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिल्लीचा एक्यूआय ४१३ नोंदवला गेला. रविवारी सकाळी तो ४५७ वर पोहोचला. दिल्लीतील बहुतेक भागांचा एक्यूआय ४५० च्या वर आहे.

शाळांना १० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी : दिल्लीतील सातत्यानं वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं एक मोठा निर्णय घेतला. दिल्लीतील प्राथमिक म्हणजेच पाचवीपर्यंतच्या शाळांना १० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सहावी ते बारावीपर्यंतच्या सर्व खासगी आणि सरकारी शाळांना ऑनलाइन वर्ग चालवण्याची सूचना देण्यात आली. दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी 'X' वर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली.

  • As pollution levels continue to remain high, primary schools in Delhi will stay closed till 10th November.

    For Grade 6-12, schools are being given the option of shifting to online classes.

    — Atishi (@AtishiAAP) November 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

As pollution levels continue to remain high, primary schools in Delhi will stay closed till 10th November.

For Grade 6-12, schools are being given the option of shifting to online classes.

— Atishi (@AtishiAAP) November 5, 2023

लहान मुलांसाठी हानिकारक : यापूर्वी ५ नोव्हेंबरपर्यंत सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. आता प्रदूषणाची वाढती पातळी लक्षात घेऊन यात आणखी मुदतवाढ करण्यात आली आहे. मंत्री आतिशी म्हणाल्या की, दिल्लीतील वायू प्रदूषण सर्वोच्च पातळीवर पोहोचलं आहे. विशेषत: लहान मुलांसाठी ते खूप हानिकारक ठरू शकतं. त्यामुळेच दिल्ली सरकारनं १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. प्रदूषणामुळे लोक अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडत आहेत, जे सरकारसाठी सर्वात मोठं चिंतेचं कारण आहे, असं त्यांनी नमूद केलं.

ग्रेटर नोएडा सर्वाधिक प्रदूषित : दिल्ली एनसीआरमध्ये, ग्रेटर नोएडा सर्वात प्रदूषित म्हणून नोंदवलं गेलंय. येथे एक्यूआय ४७४ आहे. मात्र शनिवारच्या तुलनेत तो कमी होता. याशिवाय फरिदाबादमध्ये ४६१, गुरुग्राममध्ये ४३७, नोएडामध्ये ४३४ आणि गाझियाबादमध्ये ४०६ एक्यूआय नोंदवण्यात आला.

हेही वाचा :

  1. World Cup 2023 : 'या' कारणामुळं श्रीलंकेचा प्रशिक्षण सत्र रद्द
  2. Delhi Air Pollution : दिल्लीतील वायू प्रदूषणाचा फटका विश्वचषकाला, बांग्लादेशनं सराव सत्र रद्द केलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.