नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने भीम सेनेचे प्रमुख नवाब सतपाल तंवर यांना नुपूर शर्माला धमकी दिल्याप्रकरणी अटक केली ( Special cell arrested Nawab Satpal Tanwar ) आहे. भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्माची जीभ कापणाऱ्यास एक कोटी रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आयपीसीच्या कलम ५०६, ५०९ आणि १५३अ अंतर्गत गुन्हा दाखल केला ( Case of threatening Nupur Sharma ) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्माने काही दिवसांपूर्वी टीव्ही डिबेटमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याबाबत अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. काही काळापूर्वी नुपूर शर्माला सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणांहून धमक्या दिल्या जात होत्या. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक व्हिडिओ आला होता ज्यामध्ये भीम सेनेचे प्रमुख नवाब सतपाल तंवर यांनी नुपूर शर्माबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या होत्या.
नवाब सतपाल यांनी नुपूर शर्माची जीभ कापणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. याप्रकरणी स्पेशल सेलने एफआयआर नोंदवला. यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुरुवारी सतपाल तन्वरला अटक केली आहे. गुरुग्राममध्ये दोन समुदायांमध्ये द्वेष पसरवल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
स्पेशल सेलच्या सूत्रांनी सांगितले की, स्पेशल सेलने फेसबुकवर दिलेल्या धमकीची दखल घेतली होती आणि या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. गुरुवारी पोलिसांना तो त्याच्या गुरुग्रामच्या घरी उपस्थित असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सध्या स्पेशल सेलचे सायबर सेल त्याची चौकशी करत आहे.
हेही वाचा : निलंबित भाजप प्रवक्त्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ उतरली कंगना रणौत