ETV Bharat / bharat

लाल किल्ला हिंसाचार : दिल्ली पोलिसांकडून मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू - सुखदेव सिंग

दीप सिद्धू, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांना दिल्ली पोलिसांनी रिमांडवर घेतले आहे. त्यांच्यामार्फत, लाल किल्ल्याच्या हिंसाचाराचे कट रचणाऱ्या सुत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा गुन्हे शाखा प्रयत्न करीत आहे.

लाल किल्ला हिंसाचार
लाल किल्ला हिंसाचार
author img

By

Published : Feb 11, 2021, 4:20 PM IST

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात निषेध म्हणून शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागले होते. लाल किल्ला हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत आठ मुख्य आरोपींमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यात दिप सिद्धू, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांचा समावेश आहे. हिंसा भडकवण्यामध्ये या तीन जणांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे पोलिसांनी म्हटले. तीन्ही आरोपींची सध्या गुन्हे शाखेकडून चौकशी होत असून मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लाल किल्ला हिंसाचार : दिल्ली पोलिसांकडून मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू

दीप सिद्धू, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांना पोलिसांनी रिमांडवर घेतले आहे. त्यांच्यामार्फत, लाल किल्ल्याच्या हिंसाचाराचे कट रचणाऱ्या सुत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा गुन्हे शाखा प्रयत्न करीत आहे. हिंसाचार करण्यात या तिघांचा सहभाग आहे. परंतु दुसर्‍या व्यक्तीच्या सांगण्यावरून त्यांनी हिंसाचार घडवला असल्याचे पोलिसांचा मत आहे. यासंदर्भात दोन्ही आरोपींची चौकशी केली जात आहे. या हिंसाचाराचे मुख्य षडयंत्रकारी कोण होते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हिंसाचार घडवून आणण्यासाठी फंडिंग -

आरोपींचे दुवे त्यांच्या कॉल डिटेलवरून शोधले जात आहेत. गेल्या 6 महिन्यांत ते कोणत्या लोकांच्या संपर्कात होते. हे जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. लाल किल्ल्यावरील हिंसाचारासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा निधी देण्यात आलेला आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.

पाच मुख्य आरोपी अद्याप फरार -

लाल किल्ल्यावरील हिंसाचारातील आठ मुख्य आरोपींपैकी आतापर्यंत फक्त तीन आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. तिघांनाही स्पेशल सेलने अटक केली आहे. त्याचवेळी, अन्य 5 आरोपी सध्या फरार आहेत. त्यापैकी जुगराज सिंग आणि गुरजंत सिंग यांच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर जयबीर सिंग, बूटा सिंग आणि सुखदेव सिंग यांच्यावर 50-50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यांना अटक करण्यासाठी मदत करणाऱ्यांना बक्षीस रक्कम दिली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.