नवी दिल्ली - चांदनी चौक मतदारसंघाच्या माजी आमदार व काँग्रेस नेत्या अलका लांबा यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
अलका लांबा यांचे म्हणणे आहे, की त्या जंतर-मंतर येथे महिला किसान संसदेत सहभागी होण्यासाठी जाणार होत्या.
त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, हुकूमशहाच्या आदेशावरून दिल्ली पोलिसांनी मला घरातच नजरकैदेत ठेवले आहे. पोलिसांनी त्यांना जंतर मंतर महिला किसान संसदेत सहभागी होणे व शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी त्या जाऊ शकणार नाहीत. ही लोकशाहीची हत्या नाही का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.