नवी दिल्ली - देशाची राजधानी नवी दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी म्हणून घोषित झाले आहे. जगभरातील सर्वात प्रदूषित 50 शहरांच्या यादीमध्ये 35 शहरे एकट्या भारत देशातील आहे, असे स्विस संगटन आईक्यूएयरच्या अहवालात म्हटले आहे. सलग चार वेळा सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून दिल्लीची घोषणा झाली आहे. हा अहवाल मंगळवारी (दि. 23 मार्च) सर्वत्र प्रकाशित करण्यात आला आहे. अहवालानुसार 2021 मध्ये भारतातील एकही शहर जागतीक आरोग्य संघटनेच्या निर्धारित वायु गुणवत्तेच्या मापदंडावर स्वतःला सिद्ध करू शकलेले नाही.
2021 साली जागतीक स्तरावर वायु गुणवत्तेची स्थिति दर्शवणारा अहवाल 117 देशांतील 6 हजार 475 शहरातील वातावरणात पीएम-2.5 सूक्ष्मकणांवरील सांख्यिकीवर आधारित आहे. यात सर्वाधिक प्रदूषित राजधानीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर दिल्ली (भारत), दूसऱ्या क्रमांकावर ढाका (बांग्लादेश, तिसऱ्या क्रमांकावर एनजमीना (चाड), चौथ्या क्रमांकावर दुशांबे (ताजिकिस्थान) व पाचव्या क्रमांकावर मस्कत (ओमान) हे शहर आहेत.
अहवालानुसार, 2021 में नवी दिल्लीत पीएम-2.5 सूक्ष्म कणांच्या स्तरात 14.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2020 साली 84 मायक्रोग्रॅम प्रती घन मीटर होती त्यात वाढ होऊन 2021 साली 96.4 मायक्रोग्रॅम प्रती घन मीटर झाला आहे. देशात पीएम-2.5 चे वार्षिक स्तर 2021 मध्ये 58.1 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर पोहोचले आहे. ग्रीनपीस इंडियाचे कॅपेन मॅनेजर अविनाश चंचल यांनी आईक्यूएयर आंकड्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, हे अहवाल सरकार व प्रशासनाचे डोळे उघडण्यास लावणारे आहे. हे आकडे थक्क करणारे असून अतिशय प्रदूषित हवा नागरिक श्वासावाटे घेत आहेत.
हेही वाचा - सोनिया गांधींनी आणखी असंतुष्ठ नेत्यांची भेट घेतली, मतभेद दूर करण्याचे प्रयत्न सुरू