नवी दिल्ली - आयसीयूएयर या स्विस संघटनेने तयार केलेला 'वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2020' मंगळवारी जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्लीचे नाव आहे. दिल्लीकरांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे.
केंद्राच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (एनसीएपी) मुळे 2019 च्या तुलनेत दिल्लीची हवेची गुणवत्ता 2020 मध्ये सुधारली असल्याचेही ते म्हणाले. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा दहावा क्रमांक लागतो. बांगलादेश, चीन, पाकिस्तान आणि भारतामध्ये सर्वांत जास्त प्रदूषित शहरे आहेत.
भारतातील वायू प्रदूषणाच्या मुख्य स्रोतांमध्ये वाहतूक, वीज निर्मिती, उद्योग, बांधकाम, कचरा जाळणे यांचा समावेश आहे. देशाच्या क्रमवारीत बांगलादेशात सर्वात वाईट हवा असून त्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांचा क्रमांक लागतो. जगातील राजधानीच्या शहरांच्या क्रमवारीत दिल्ली सर्वात जास्त प्रदूषित शहर आहे.
हेही वाचा - कर्नाटकात भीषण अपघात; महाराष्ट्रातील दोन कबड्डीपटूंचा मृत्यू