नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत आज पुन्हा वाढ करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर सीबीआयने त्यांना आज दुपारी दोन वाजता राऊस अव्हेन्यू कोर्टातील विशेष सीबीआय न्यायाधीश एम के नागपाल यांच्या न्यायालयात हजर केले. यानंतर आता न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 27 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. ईडी प्रकरणातही त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 29 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
-
शराब घोटाला मामले में राउज एवेन्यू कोर्ट ने मनीष सिसोदिया की न्यायिक हिरासत ईडी और सीबीआई से जुड़े आदेश में संशोधन किया। सिसोदिया की न्यायिक हिरासत अब अदालत ने सीबीआई मामले में 27 अप्रैल तक और ईडी मामले में 29 अप्रैल तक बढ़ा दी है। https://t.co/cukUIXUnAz
— ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">शराब घोटाला मामले में राउज एवेन्यू कोर्ट ने मनीष सिसोदिया की न्यायिक हिरासत ईडी और सीबीआई से जुड़े आदेश में संशोधन किया। सिसोदिया की न्यायिक हिरासत अब अदालत ने सीबीआई मामले में 27 अप्रैल तक और ईडी मामले में 29 अप्रैल तक बढ़ा दी है। https://t.co/cukUIXUnAz
— ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2023शराब घोटाला मामले में राउज एवेन्यू कोर्ट ने मनीष सिसोदिया की न्यायिक हिरासत ईडी और सीबीआई से जुड़े आदेश में संशोधन किया। सिसोदिया की न्यायिक हिरासत अब अदालत ने सीबीआई मामले में 27 अप्रैल तक और ईडी मामले में 29 अप्रैल तक बढ़ा दी है। https://t.co/cukUIXUnAz
— ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2023
अन्य आरोपींच्या कोठडीतही वाढ : मनीष सिसोदिया यांच्यासह अन्य आरोपी अरुण रामचंद्र पिल्लई आणि अमनदीप धल्ल यांच्या न्यायालयीन कोठडीतही न्यायालयाने वाढ केली आहे. ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यात अरुण पिल्लई आणि अमनदीप धल्ल यांच्या न्यायालयीन कोठडीत 29 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिसोदिया जेव्हा सुनावणीसाठी कोर्टात पोहोचले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते.
अरविंद केजरीवाल यांची काल साडेनऊ तास चौकशी : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी काल सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. त्यांना या प्रकरणी तब्बल 56 प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मी सीबीआयने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. तसेच हे प्रकरण पूर्णपणे खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
20 एप्रिलला जामिनावर सुनावणी : यापूर्वी 31 मार्च रोजी सीबीआय प्रकरणात न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण टिपण्णी करून त्यांची जामीन याचिका फेटाळली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 17 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती. यानंतर मनीष सिसोदिया यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर हायकोर्टाने जामीन याचिकेवर सुनावणी करताना सीबीआयला नोटीस बजावून 20 एप्रिलपूर्वी उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. आता 20 एप्रिलला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
26 फेब्रुवारीला केली होती अटक : अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने 26 फेब्रुवारीला मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. यानंतर न्यायालयाने त्यांची सीबीआय कोठडीत चौकशीसाठी रवानगी केली. सीबीआय रिमांड संपल्यानंतर मनीष सिसोदिया यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. तिहार तुरुंगात चौकशीदरम्यान त्यांना 9 मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. तेव्हापासून सिसोदिया तुरुंगात आहेत.
हेही वाचा : NAVJOT SINGH SIDHU NEWS : नवज्योत सिंग सिद्धू यांच्या घराच्या छतावर दिसली संशयास्पद व्यक्ती