ETV Bharat / bharat

दिल्ली दारू घोटाळा : अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडी छापेमारीची आप नेत्यांनी वर्तवली शक्यता - मंत्री सौरभ भारद्वाज

Delhi Liquor Scam: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं तिसरं समन्स पाठवूनही ते चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यामुळं ईडी अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापेमारी करण्याची शक्यता, आपचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि खासदर संदीप पाठक यांनी वर्तवली आहे.

Delhi Liquor Scam
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 8:22 AM IST

Updated : Jan 4, 2024, 10:10 AM IST

नवी दिल्ली Delhi Liquor Scam: आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापेमारी केली जाण्याची शक्यता आपच्या नेत्यांनी वर्तवली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीनं पाठवलेल्या तिसऱ्या समन्सवरही बुधवारी अरविंद केजरीवाल चौकशीसाठी गेले नाहीत. त्यामुळं बुधवारी उशीरा आम आदमी पक्षाचे खासदार संदीप पाठक, आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज, आतिशी यांनी ही शक्यता वर्तवली आहे.

Delhi Liquor Scam
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं निवास्थान

मंत्री सौरभ भारद्वाज यांनी एक्सवर व्यक्त केली शंका : अरविंद केजरीवाल हे ईडी चौकशीला गेले नसल्यानं ईडी अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापेमारी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी एक्सवर याबाबतची शक्यता व्यक्त केली आहे. ईडीनं बुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवलं होतं. मात्र त्यानंतरही ते चौकशीला गैरहजर राहिले.

  • Delhi CM @ArvindKejriwal likely to be raided tomorrow early morning by ED

    — Dr. Sandeep Pathak (@SandeepPathak04) January 3, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • सुनने में आ रहा है कल सुबह मुख्यमंत्री केजरीवाल जी के घर ED पहुँच कर उन्हें गिरफ़्तार करने वाली है ।

    — Saurabh Bharadwaj (@Saurabh_MLAgk) January 3, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • News coming in that ED is going to raid @ArvindKejriwal’s residence tmrw morning. Arrest likely.

    — Atishi (@AtishiAAP) January 3, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा गैरहजर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं तिसऱ्यांदा चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवलं होतं. मात्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या तिसऱ्या समन्सच्यावेळीही चौकशीसाठी गैरहजर राहणं पसंद केलं. अरविंद केजरीवाल यांनी या समन्सला उत्तर दिलं. यात त्यांनी "माझ्यावर केलेल्या आरोपाबाबात मी आक्षेप घेतले आहेत. मात्र त्या आक्षेपाला ईडीकडून काहीच प्रतिसाद न दिल्यानं मला आश्चर्य वाटते. माझ्या आक्षेपाबाबत उत्तर दिलं नाही, उलट तिसरा समन्स पाठवला. या समन्सचं तुमच्याकडं काहीही ठोस कारण नसल्याचा माझा ठाम विश्वास आहे. ईडीचं वर्तन मनमानी आहे" असं अरविंद केजरीवाल यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ईडीनं दारू घोटाळ्यात आपच्या खासदाराला केली अटक : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना ईडीनं दारू घोटाळ्यात अटक केल्यानंतर ईडीला सबळ पुरावे मिळाल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे. त्यामुळंच ईडीनं नोव्हेंबरमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पहिल्यांदा समन्स पाठवलं होतं. त्यानंतर ईडीनं 2 नोव्हेंबरला पुन्हा अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावलं होतं, मात्र तरीही ते गेले नाहीत. त्यानंतर ईडीनं अरविंद केजरीवाल यांना तिसऱ्यांना समन्स देत चौकशीसाठी बोलावलं आहे.

कोणत्या कायद्यानुसार समन्स पाठवलं याची माहिती द्या : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात ईडीनं समन्स पाठवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी चौकशीकडं पाठ फिरवली आहे. मात्र दुसरं समन्स आल्यानंतर त्यांनी ईडीला पत्र लिहून कोणत्या कायद्यानुसार समन्स पाठवलं, त्याची माहिती द्यावी, अशी विनंती ईडीकडं केली आहे. ईडीनं तिसरं समन्स पाठवल्यानंतर अरविंद केजरीवाल हे विपश्यनेला गेले होते.

हेही वाचा :

  1. अरविंद केजरीवाल यांना ईडीनं दुसऱ्यांदा पाठवलं समन्स; कथित दारू घोटाळा प्रकरणी होणार चौकशी
  2. चौकशी टाळून गेले विपश्यनेला, ईडीच्या नोटीशीला केजरीवालांचं वकिलांमार्फत उत्तर, कायदेशीर चौकशीसाठी तयार

Last Updated : Jan 4, 2024, 10:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.