ETV Bharat / bharat

कोरोनिल किटवरून रामदेव बाबांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून समन्स

author img

By

Published : Jun 3, 2021, 3:12 PM IST

दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना समन्स बजावले आहे. पतंजलीच्या कोरोनिल किटसंदर्भातील खोटी माहिती रोखण्यासाठी दिल्ली मेडिकल असोसिएशनने (डीएमए) दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

बाबा रामदेव
बाबा रामदेव

नवी दिल्ली - अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवरून केलेल्या वक्तव्यामुळे बाबा रामदेव अडचणीत सापडले आहेत. यातच आता दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना समन्स बजावले आहे. पतंजलीच्या कोरोनिल किटसंदर्भातील खोटी माहिती रोखण्यासाठी दिल्ली मेडिकल असोसिएशनने (डीएमए) दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कोरोनिल किटविषयी पतंजलीकडून खोटी माहिती पसरवण्यात येत आहे. यामुळे कोरोना काळात लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहेत, असा आरोप रामदेव यांच्यावर आहे. कोरोनिल किटसंदर्भातील भ्रामक दावा रोखण्यासाठी दिल्ली मेडिकल असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती सी हरिशंकर यांनी आज याप्रकरणी सुनावणी केली. उच्च न्यायालयाने रामदेव यांना 13 जुलै म्हणजे सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत कोणतीही भडकावू विधाने न करण्याचा सल्ला दिला आहे.

बाबा रामदेव आणि भारतीय मेडिकल असोसिएशन वाद -

यापूर्वी, दिल्ली मेडिकल असोसिएशनच्यावतीने बाबा रामदेव यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. रामदेव बाबा यांनी अ‍ॅलोपॅथीला मूर्ख विज्ञान म्हटल्यानंतर हा एफआयआर 22 मे रोजी डीएमएने दाखल केला होता. यांनी अ‍ॅलोपॅथीसंदर्भातील रामदेव बाबांच्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला होता. त्यावर केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनीही रामदेव बाबांना पत्र लिहिले होते. या पत्रानंतर रामदेव यांनी आपले विधाने मागे घेत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, अद्यापही बाबा रामदेव आणि भारतीय मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद मिटलेला दिसत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.