ETV Bharat / bharat

दाट धुक्याचा विमानसेवा, रेल्वेला फटका; 17 विमान रद्द, रेल्वेसेवा विस्कळीत - 17 विमान उड्डाणं रद्द

Delhi Fog : दिल्लीत दाट धुक्यामुळं तब्बल 17 विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर 30 विमानांची उड्डाणं उशीरानं होत आहेत. दाट धुक्याचा फटका रेल्वेसेवेलाही बसला आहे. अनेक रेल्वे उशीरानं चालत असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Delhi Fog
संपादित छायाचित्र
author img

By ANI

Published : Jan 16, 2024, 10:23 AM IST

नवी दिल्ली Delhi Fog : राजधानी दिल्लीत थंडीच्या कडाक्यानं नागरिकांना चांगलाच फटका बसला आहे. दुसरीकडं दाट धुक्यामुळं दिल्लीतून उड्डाण करणारी 30 विमानं उशीरानं निघाली आहेत. तर तब्बल 17 विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं. दाट धुक्याचा परिणाम रेल्वे सेवेवरही झाला. त्यामुळं रेल्वे उशीरानं धावत आहेत. दिल्लीतील किमान तापमान 5 अंशावर नोंदवलं गेलं आहे. त्यामुळं नागरिकांचा चांगलाच संताप होत आहे.

  • #WATCH | Uttar Pradesh | Varanasi covered in a blanket of dense fog as cold wave conditions prevail.

    As per IMD, the city is likely to experience a minimum temperature of 8°C and a maximum temperature of 17.0°C today.

    (Visuals shot at 7 am) pic.twitter.com/k7lLmaTTYa

    — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 16, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दाट धुक्याचा दृश्यमानतेवर परिणाम : दिल्लीसह उत्तर भारतात थंडीमुळं दाट धुकं पसरलं आहे. दाट धुक्याचा परिणाम दृश्यमानतेवरही झाला आहे. त्यामुळं दिल्लीतून उड्डाण करणारी तब्बल 17 विमानं रद्द करण्यात आली आहेत. तर 30 विमानं उशीरानं उड्डाण करत आहेत. याबाबत वृत्तसंस्थेला बोलताना एका प्रवाशानं सांगितलं की, "माझी फ्लाईट सकाळी 8.40 वाजता निघणार होती. मात्रत्र आता फ्लाईटची वेळ 10.30 करण्यात आली आहे. दाट धुक्यामुळं विमान उड्डाणास उशीर होत असल्याचं कारण विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलं आहे." याबाबत बोलताना दुसऱ्या प्रवाशानं वृत्तसंस्थेला सांगितलं की, "दिल्ली विमानतळानं एक अॅ़व्हायझरी जारी केली आहे. कमी दृश्यमानता असल्यानं विमान उड्डाणावर त्याचा परिणाम होत आहे. विमान उड्डाण उशीरा होत असल्यानं संबंधित विमान प्राधिकरणासोबत संपर्क करण्यास सांगितलं आहे."

दिल्लीत नोंदवण्यात आली 500 मिटर दृश्यमानता : दाट धुक्यामुळं दिल्लीत 500 मिटर दृश्यमानता नोंदवण्यात आल्याची माहिती हवामान विभागाती सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. पालम आणि सफदरजंग विमानतळावर हवामान विभागानं ही दृश्यमानता नोंदवण्यात आली आहे. सोमवारी राजस्थानमधील श्री गंगानगर, पतियाळा, अंबाला, चंदीगड, पालम, नवी दिल्ली, बरेली, लखनऊ, वाराणसी, प्रयागराज, आणि तेजपूर इथं शून्य दृश्यमानता नोंदवण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. फ्लाइटला उशीर झाल्यास प्रवाशांना 'व्हॉट्सअ‍ॅप'वर मिळणार अपडेट, इंडिगोतील घटनेनंतर DGCA ने जारी केली SOP
  2. Test for Emergency Plane landing महामार्गावर आपत्कालीन विमान उतरण्यासाठी केली चाचणी पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.