ETV Bharat / bharat

मुख्यमंत्री केजरीवालांच्या गृहकैदेविरोधात उपमुख्यमंत्र्यांचे ठिय्या आंदोलन - भारत बंद आंदोलन

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गृहकैदेत ठेवल्याचा आरोप त्यांनी दिल्ली पोलिसांवर केला आहे.

मनीष सिसोदिया आंदोलन
मनीष सिसोदिया आंदोलन
author img

By

Published : Dec 8, 2020, 6:43 PM IST

नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना गृहकैदेत ठेवल्याचा आरोप त्यांनी दिल्ली पोलिसांवर केला आहे. त्याविरोधात त्यांचे आंदोलन सुरू आहे.

केजरीवाल आज सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलकांना भेटण्यास गेले होते. त्यानंतर त्यांना गृहकैदेत ठेवल्याचा आरोप आपने केला आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मुख्यमंत्र्यांना नरजकैदेत ठेवले नसून त्यांच्या घरी कोणीही जाऊ शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलीस उपायुक्त काय म्हणाले?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर तैनात केलेला फौजफाटा दैनिंदिन सुरक्षेप्रमाणेच आहे. मुख्यमंत्री निवसास्थानासोबत आम्ही समन्वय साधत आहोत. ज्या व्यक्तींना ते आत सोडण्याची विनंती करत आहेत, त्यांना आम्ही आतमध्ये सोडत आहोत, असे दिल्लीचे उत्तर विभागाचे पोलीस उपायुक्त आंतो अल्फान्सो म्हणाले.

भारत बंदला प्रतिसाद

मुख्यता पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी चक्का जाम करत महत्त्वाचे रस्ते सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात बंद केले. दुकाने आणि बाजारपेठाही बंद आहेत. अनेक राज्यात वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. भारत बंदचा सर्वात जास्त परिणाम पंजाब, हरयाणा आणि दिल्ली राज्यात झाला आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशा राज्यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी रेल्वे अडवल्या आहेत. दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमले असून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.