ETV Bharat / bharat

Delhi Crime News : राजधानी दिल्लीत 'सैराट'सारखा थरार, बापाने मुलीच्या प्रियकराची केली दिवसाढवळ्या हत्या! - दिल्लीत वडिलांनी मुलीच्या प्रियकराची हत्या केली

दिल्लीत एका पित्याने आपल्या दोन मुलांच्या मदतीने मुलीच्या प्रियकराची हत्या केली. आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. सध्या तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Delhi Crime News
वडिलांनी मुलींच्या प्रियकराची हत्या केली
author img

By

Published : Jul 17, 2023, 10:56 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीतील जाफराबादमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका पित्याने आपल्या मुलीच्या प्रियकराचा चाकूने वार करून उघडपणे खून केला. आरोपी पित्याने आपल्या दोन मुलांच्या मदतीने हा खून केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ईशान्य दिल्लीच्या जाफराबाद पोलिस स्टेशनने पुढील तपास सुरू केला आहे.

एक आरोपी अल्पवयीन : गुन्ह्यातील तिन्ही आरोपी सध्या फरार आहेत. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. तीन आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. ईशान्य दिल्लीचे डीसीपी डॉ. जॉय तिर्की यांनी सोमवारी संध्याकाळी सांगितले की, मृत व्यक्तीचे नाव सलमान (वय २५ वर्षे) आहे. तो ब्रह्मपुरी गली क्रमांक ७, जाफराबाद येथील रहिवासी आहे.

तरुणाचा जागीच मृत्यू झाला : डीसीपी म्हणाले की, सोमवारी संध्याकाळी सव्वापाच वाजता जाफराबाद पोलीस स्टेशनला चौहान बागड गली क्रमांक 2 कल्याण सिनेमाजवळ एका तरुणावर चाकूने वार केल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. त्याच्या मानेवर आणि छातीवर खोल जखमेच्या खुणा होत्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

दोघे दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते : सलमानची गेल्या 2 वर्षांपासून एका मुलीसोबत मैत्री होती. मात्र या नात्याला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. सलमान मोटारसायकलवरून जात असताना मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलांच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी सलमानला थांबवून त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. त्यात सलमानचा जागीच मृत्यू झाला. आरोपी खून करून तेथून पळून गेले.

हे ही वाचा :

  1. Nashik Crime : तलवारीने वार करत दोन गट भिडले, एक युवक गंभीर जखमी
  2. Delhi Crime News : पतीच्या मृत्यूनंतर एकजण करत होता बलात्कार, महिलेने केले असे काही..
  3. UP Crime News : पती सेक्स करु शकत नसल्याने पत्नीने गाठले पोलीस स्टेशन, गु्न्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.