ETV Bharat / bharat

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता - काँग्रेस नेते शशी थरूर

दिल्लीच्या न्यायालयाने सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.सुनंदा पुष्कर यांचा 17 जानेवारी 2014 साली हॉटेलमध्ये संशयितरित्या मृतदेह सापडला होता

Delhi Court discharges Shashi Tharoor in Sunanda Pushkar death case
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण
author img

By

Published : Aug 18, 2021, 11:28 AM IST

Updated : Aug 18, 2021, 11:49 AM IST

नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊज एव्हन्यू न्यायालयाने सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 7 वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर आज न्याय मिळाला. शशी थरूर यांना पहिल्यापासूनच न्यायव्यवस्थेवर विश्वास होता, असे निकालानंतर थरूर यांचे वकिल विकास पहवा म्हणाले.

सुनंदा पुष्कर यांचा 17 जानेवारी 2014 साली हॉटेलमध्ये संशयितरित्या मृतदेह सापडला होता. सरकारी बंगल्याचे नुतनीकरण चालू असल्याने सुनंदा पुष्कर आणि शशी थरुर दोघे हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री असलेल्या शशी थरुर यांच्यावर भारतीय दंड संहिता 498-ए आणि 306 नुसार गुन्हा दाखल झाला होता.

सुनंदा यांनी 2010 मध्ये शशी थरुर यांच्यासोबत लग्न केलं होतं. हा त्यांचा तिसरा विवाह होता. सुनंदा पुष्कर या काश्मीरमध्ये जन्मलेल्या उद्योजिका होत्या. न्यायालयात घरातील नोकरांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यावरून सुनंदा आणि शशी थरुर यांच्यात नेहमी भांडण व्हायची. यानंतर 2014 साली दिल्लीतील एका हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळल्या होत्या. यानंतर थरुर यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप होता.

हेही वाचा - सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण: शशी थरुर यांना परदेशात जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी

Last Updated : Aug 18, 2021, 11:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.