नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी नजरकैद केले असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. काल (सोमवार) केजरीवाल यांनी सिंघू सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली होती. यानंतर ते आपल्या निवासस्थानी परतले होते, जिथे त्यांना नजरकैद करण्यात आले आहे असे आपचे म्हणणे आहे.
-
Important :
— AAP (@AamAadmiParty) December 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
BJP's Delhi Police has put Hon'ble CM Shri @ArvindKejriwal under house arrest ever since he visited farmers at Singhu Border yesterday
No one has been permitted to leave or enter his residence#आज_भारत_बंद_है#BJPHouseArrestsKejriwal
">Important :
— AAP (@AamAadmiParty) December 8, 2020
BJP's Delhi Police has put Hon'ble CM Shri @ArvindKejriwal under house arrest ever since he visited farmers at Singhu Border yesterday
No one has been permitted to leave or enter his residence#आज_भारत_बंद_है#BJPHouseArrestsKejriwalImportant :
— AAP (@AamAadmiParty) December 8, 2020
BJP's Delhi Police has put Hon'ble CM Shri @ArvindKejriwal under house arrest ever since he visited farmers at Singhu Border yesterday
No one has been permitted to leave or enter his residence#आज_भारत_बंद_है#BJPHouseArrestsKejriwal
दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर लावले बॅरिकेट्स..
केजरीवाल काल शेतकऱ्यांना भेटून आपल्या घरी परतले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांच्या घराच्या सर्व बाजूंनी बॅरिकेट्स लावले आहेत. जेणेकरुन कोणीही आत जाऊ शकणार नाही, किंवा आतील व्यक्ती बाहेर येऊ शकणार नाही, असे आप नेते सौरभ भारद्वाज यांनी सांगितले.
आमदारांना पोलिसांनी केली मारहाण..
काही आमदारांची काल केजरीवाल यांच्यासोबत बैठक होती. त्यासाठी काही आमदार त्यांच्या निवासस्थानी गेले असता, पोलिसांनी त्यांना मारहाण केली असा आरोपही भारद्वाज यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप नेते बसून असल्याचेही सौरभ यांनी सांगितले.
सुरक्षेसाठी केलेली व्यवस्था..
आम आदमी पक्ष आणि इतर कोणत्या पक्षामध्ये झटापट होऊ नये, किंवा आंदोलनामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेले नाही. ही साधारण प्रक्रिया आहे, असे नॉर्थ दिल्लीचे पोलीस उपायुक्त अँटो अल्फोन्से यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा १३वा दिवस; आज भारत बंद!