ETV Bharat / bharat

शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' आंदोलनाचा चौथा दिवस; पाहा LIVE अपडेट्स..

Delhi Chalo protest Farmers LIVE Updates
शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' आंदोलनाचा चौथा दिवस; पाहा LIVE अपडेट्स..
author img

By

Published : Nov 29, 2020, 9:12 AM IST

Updated : Nov 29, 2020, 2:04 PM IST

14:01 November 29

दिल्लीतील शेतकऱ्यांना दहशतवाद्याप्रमाणे वागणूक - संजय राऊत

दिल्लीतील शेतकऱ्यांना केंद्र सरकार दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक देत असल्याचे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले.

13:21 November 29

बुराडीमध्ये न जाण्यावर शेतकरी संघटना ठाम; अमित शाहांसोबतच्या बैठकीबाबत अद्याप निर्णय नाही..

दुपारी एकच्या सुमारास शेतकरी संघटनांची एक गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची जागा न बदलण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. मात्र, अमित शाहांशी चर्चा करण्याबाबत कोणताही निर्णय या बैठकीत घेण्यात आला नाही.

09:08 November 29

बुराडीमध्ये नाही हलवणार आंदोलन; शेतकऱ्यांचा सीमेवरच ठिय्या..

दिल्ली-हरियाणा, तसेच दिल्ली-गाझियाबाद सीमेवर थांबलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी बुराडी मैदानात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमांवर थांबून आहेत.

09:07 November 29

दररोज सकाळी ११ वाजता ठरणार रणनीती..

आंदोलनाची पुढील रणनीती काय असणार हे ठरवण्यासाठी दररोज सकाळी ११ वाजता बैठक घेण्याचा निर्णय कृषी संघटनांनी घेतला आहे. शेतकरी आंदोलनासाठी येताना जवळपास महिनाभर पुरेल एवढे सामान घेऊन आले आहेत.

09:06 November 29

अमित शाहांची चर्चेची तयारी..

शेतकऱ्यांसोबत तीन डिसेंबरला चर्चा करण्याची तयारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दाखवली आहे. मात्र, त्यासाठी आधी शेतकऱ्यांनी आंदोलनाची एक जागा निश्चित करावी अशी अट त्यांनी घातली आहे.

08:51 November 29

शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' आंदोलनाचा चौथा दिवस..

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्याविरोधी शेतकरी आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. दिल्ली सरकारने बुराडी परिसरात आंदोलन करण्यासाठी परवानगी दिल्यानंतरही शेतकऱ्यांनी सीमेवरच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे शेतकरी आज सकाळी आपली पुढील रणनीती ठरवणार आहेत.

Last Updated : Nov 29, 2020, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.