गांधीनगर ( गुजरात) : Defence Expo 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथे उद्घाटन PM Modi inaugurate DefExpo 2022 होणार्या आगामी डिफेन्स एक्स्पोचे प्रमाण मागील वेळेपेक्षा खूप मोठे असेल. सरकार 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकीसाठी 400 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करेल, अशी अपेक्षा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
डिफेन्स एक्स्पो (DefExpo 2022) गांधीनगर येथे 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. संरक्षण सचिव डॉ अजय कुमार म्हणाले, 'पथ टू प्राइड' या थीमसह संरक्षण प्रदर्शनाची ही १२ वी आवृत्ती देशातील सर्वात मोठी असेल. संरक्षण उत्पादनात स्वावलंबी होण्याची आमची वचनबद्धता यातून दिसून येईल. 19 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.
कुमार म्हणाले, “या डिफेन्स एक्स्पोचे प्रमाण देशातील यापूर्वीच्या कोणत्याही कार्यक्रमापेक्षा मोठे असेल. एक्स्पो दरम्यान स्वाक्षरीसाठी आतापर्यंत 400 सामंजस्य करारांना अंतिम रूप देण्यात आले आहे. ज्यामुळे 1.25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. ही गुंतवणूक वचनबद्धता आणि सामंजस्य करारांची संख्या मागील एक्स्पोच्या दुप्पट आहे.
ते म्हणाले की, गुजरातमधील कंपन्या 33 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करतील. ज्यात राज्यात 5,500 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे. एक लाख स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त परिसरात आयोजित या एक्स्पोमध्ये 1,320 हून अधिक संरक्षण कंपन्या सहभागी होणार आहेत. ते म्हणाले की, गेल्या डिफेन्स एक्स्पोमध्ये सुमारे 1,028 कंपन्यांनी भाग घेतला होता, तर सध्याच्या आवृत्तीत 25 देशांचे संरक्षण मंत्री आणि 75 देशांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.
कुमार म्हणाले, “तीन गोष्टी या एक्स्पोचे मुख्य आकर्षण असतील. एचएएलने स्वदेशी डिझाइन केलेले आणि विकसित केलेले ट्रेनर विमान प्रथमच एक्स्पोमध्ये प्रदर्शित केले जाईल. गुजरातमधील डीसा येथील नव्याने विकसित विमानतळाचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन केले जाईल आणि संरक्षण उत्पादनातील 75 आव्हाने स्टार्ट-अप आणि उद्योगांसाठी खुली केली जातील.'
अतिरिक्त सचिव (संरक्षण उत्पादन) संजय जाजू म्हणाले की, भारत-आफ्रिका संरक्षण संवाद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह Defence Minister rajnath Singh यांच्या उपस्थितीत ५० हून अधिक आफ्रिकन देशांच्या सहभागासह होणार आहे. ते म्हणाले की, स्वतंत्र हिंद महासागर क्षेत्र प्लस (IOR+) परिषद देखील आयोजित केली जाईल, ज्यामध्ये सुमारे 40 देशांचे प्रतिनिधी उपस्थित असतील.
शिखर परिषदेत चीनच्या सहभागाबद्दल विचारले असता, जाजू म्हणाले की, बीजिंग आयओआर प्लसचा पक्ष नाही. देशाच्या सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी निधीच्या प्रश्नावर संरक्षण सचिव कुमार म्हणाले, "सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे." ते म्हणाले की, पाच दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान, पहिले तीन दिवस व्यवसायासाठी असतील, तर 21 आणि 22 ऑक्टोबर सामान्य लोकांसाठी असतील. प्रथम कोविड-19 महामारीमुळे आणि नंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे दोनदा एक्स्पो होऊ शकला नाही.