ETV Bharat / bharat

पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या काश्मीरमध्ये एक आहे 'मृत्यूची दरी' - जम्मू काश्मीर मृत्यूची दरी

समुद्रसपाटीपासून 12 हजार 125 फूट उंचावर डोंगर दऱ्यांमध्ये ही मॉर्गन दरी असून दक्षिण अनंतनाग जिल्ह्याच्या मुख्य शहरापासून सुमारे 72 किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थान नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. मात्र, भीषण हिमवादळे, जोरदार वाहणारे वारे आणि मुसळधार पावसामुळे हे एक धोकादायक ठिकाण मानले जाते. विशेष म्हणजे, असुरक्षित ठिकाण असूनही मॉर्गन दरी पर्यटकांच्या आवडीचे स्थान आहे.

काश्मीर खोरे
काश्मीर खोरे
author img

By

Published : Nov 19, 2020, 6:08 AM IST

नवी दिल्ली - काश्मीर खोरे हे स्वच्छ नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. काश्मीरचे नैसर्गिक सौंदर्य हे जणू पृथ्वीवरील स्वर्गासारखे आहे आणि जगातील प्रसिद्ध स्थाने गुलमर्ग, पहलगाम आणि डल तलाव या नंदनवनाचे प्रतीक आहेत. मात्र, तुम्हाला कदाचित माहिती नसेल की, या नंदनवनात एक विचित्र दरी आहे, जिला 'मृत्यूची दरी' म्हणून ओळखले जाते.

पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या काश्मीरमध्ये एक आहे 'मृत्यूची दरी'

समुद्रसपाटीपासून 12 हजार 125 फूट उंचावर डोंगर दऱ्यांमध्ये ही मॉर्गन दरी असून दक्षिण अनंतनाग जिल्ह्याच्या मुख्य शहरापासून सुमारे 72 किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थान नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. मात्र, भीषण हिमवादळे, जोरदार वाहणारे वारे आणि मुसळधार पावसामुळे हे एक धोकादायक ठिकाण मानले जाते. विशेष म्हणजे, असुरक्षित ठिकाण असूनही मॉर्गन दरी पर्यटकांच्या आवडीचे स्थान आहे.

खोऱ्यातील वाळू जिवंत आहे

कधीकधी कडक उन्हानंतरही दुपारी 2 ते 3 पर्यंत येथे बर्फ पडत राहतो. येथे नेहमीच धोका असतो. असे म्हणतात की, येथे तुम्ही आलात तर संध्याकाळी 4 च्या आधी मॉर्गन दरी सोडणे चांगले, असे स्थानिक पर्यटक शौकत अहमद यांनी सांगितले.

मॉर्गन दरी परिसर खडकाळ पर्वतांनी वेढला आहे. येथे झाडे जवळपास नाहीतच. असेही म्हटले जाते की, या खोऱ्यातील वाळू जिवंत आहे. लोकांचे म्हणणे आहे की, या परिसरात अचानक जोरदार वारा वाहतो आणि गारांच्या वादळासह पाऊस पडण्यास सुरुवात होते, तेव्हा दगड आणि खडक आजूबाजूच्या डोंगराच्या शिखरांवर आदळतात आणि येथे आलेल्या लोकांना त्यावेळी लपण्यासाठी सुरक्षित जागा शोधणेही मुश्कील होते. मेंढ्या, बकऱ्या चरवण्यासाठी गेलेले खराब हवामान परिस्थितीमुळे बर्‍याचदा अडचणीत सापडतात.

लोक बर्‍याचदा पाऊस किंवा बर्फामुळे अडकून पडतात

काही वर्षांपूर्वी येथे 100 -150 जनावरे मारली गेली. तर दुसर्‍या घटनेत येथे आठ ते दहा जणांनी आपला जीव गमावला. जूनमध्ये हा प्रकार घडला आणि एका महिन्यानंतर खराब हवामानामुळे येथे आणखी तीन लोक मरण पावले, असे स्थानिक रहिवासी लियाकत खान म्हणाले. मॉर्गन दरी किश्तवाड आणि अनंतनाग जिल्ह्याच्या मध्यभागी आहे. उंचीचे ठिकाण असल्याने उन्हाळ्यातही येथे तापमान कमी असते. येथे येणारे लोक बर्‍याचदा पाऊस किंवा बर्फामुळे अडकून पडतात.

चार वर्षांपूर्वी मी या जिल्ह्यातील माडवा वधवन भागात कार्यरत होतो. आम्ही बर्‍याचदा बातम्या ऐकायचो, चार लोकांपैकी एकाचा मृत्यू झाला आणि तीन जिवंत राहिले. दुसर्‍या घटनेत दोघांपैकी एक बचावला. या ठिकाणी पोहोचणे सुलभ व्हावे, लोकांना अधिक सुरक्षितपणे पोहचण्यासाठी सरकार येथे पायाभूत सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही अर्शद सलाम (अभियंता अधिकारी) म्हणाले.

'मृत्यूची दरी' म्हणणे आता थांबवावे

मॉर्गन टॉपच्या रस्त्याचे बांधकाम 2003 मध्ये सुरू झाले. अर्ध्या रस्त्याचे काम व्हॅल्यूकडून तर अर्ध्या रस्त्याचे काम किश्तवाड माधवद्वारे पूर्ण होणार आहे. ते पूर्णत्वास येत आहे. म्हणूनच मला वाटते की लोकांनी या जागेला 'मृत्यूची दरी' म्हणणे आता थांबवावे. आगामी काळात मार्गन टॉप एक अनोखे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येईल, असा मला विश्वास वाटतो, असेही अर्शद सलाम, अभियंता अधिकारी

प्रशासन सध्या मॉर्गन खोऱ्यात झोपड्या व सार्वजनिक शौचालये बांधत आहे. हे स्थान लवकरच काश्मीरमधील एक अतिशय आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक पर्यटन स्थळ असेल. मात्र, इतक्या उंचीवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यास किती वेळ लागेल आणि कधीपर्यंत या अलौकिक ठिकाणी पर्यटक जाऊ शकतील, हे सांगणे कठीण आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.