ETV Bharat / bharat

कर्नाटक : दूषित पाण्याने ६ जणांनी गमाविला जीव; सरकारकडून ३ लाखांची मदत जाहीर - अस्वच्छ पाणी मृत्यू

नागरिकांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही कर्नाटक सरकारने दिले आहेत. दूषित पाणी हे नळाच्या पाण्यात मिसळण्याकरिता जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. बेल्लारी, हुबळी आणि हावेरी येथील रुग्णालयांमध्ये काही नागरिकांवर उपचार सुरू आहेत.

Death toll rises 6
Death toll rises 6
author img

By

Published : Oct 6, 2021, 5:56 AM IST

बंगळुरू- सांडपणी हे पिण्यात मिसळल्याने कर्नाटकमधील सहा जणांचा मृत्यू झाला. ही घटना विजयनगर जिल्ह्यातील हुविनाहडगलीमधील मकरब्बी गावात घटली आहे.

मकरब्बी गावातील १५० हून अधिक जण हे अस्वच्छ पाण्यामुळे २३ सप्टेंबरला आजारी पडले आहेत. २७ सप्टेंबरला नीलाप्पा या ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर १ ऑक्टोबरला लक्काम्मा या महिलेचा १ ऑक्टोबरला मृत्यू झाला. बसाम्मा याा महिलेचा ३ ऑक्टोबरला मृत्यू झाला. त्यानंतर कंचाम्मा, गोनेप्पा आणि महादेवाप्पा यांचा मृत्यू झाला. उलटी आणि मळमळ झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बेल्लारी, हुबळी आणि हावेरी येथील रुग्णालयांमध्ये काही नागरिकांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा-गांधीनगर पालिका निवडणुकीत भाजपचा विजय, 44 पैकी जिंकल्या 41 जागा

गावातील लोक शेजारी गावात स्थलांतरित-

गावातील लोकांचे मृत्यू झाल्यांत गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक जण गाव सोडून शेजारच्या गावात स्थलांतरित झाले आहे. तर काही जणांना आपली मालत्ता विकून उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. गावातील विंधन विहिरीचे पाणी बंद करण्यात आले आहे. गावात टँकरने पाणी पुरविले जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद यांनी सांगितले.

हेही वाचा-राहुल गांधी आज लखीमपूरमध्ये पोहोचण्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे दिले आदेश-

दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबांना सरकारने ३ लाखांची मदत जाहीर केली आहे. नागरिकांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही कर्नाटक सरकारने दिले आहेत. दूषित पाणी हे नळाच्या पाण्यात मिसळण्याकरिता जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

हेही वाचा-LAKHMIPUR केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक करा- राकेश टिकैतांचा योगी सरकारला आठवडाभराचा अल्टीमेटम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.