प्रसिद्ध अभिनेते, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टी, टीव्ही कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रालाही त्यांच्या निधनाने मोठा धक्का बसला ( death of Raju Srivastava shocked political sphere ) आहे. एक अत्यंत हुशार, तल्लख बुद्धी असलेले आणि हजरजबाबी अभिनेत्याला सिनेक्षेत्र मुकले आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. विविध राजकीय नेत्यांनी राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
एकीकडे बॉलिवूड कलाकार त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत असताना दुसरीकडे देशातील दिग्गज नेत्यांनीही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. देशातील दिग्गज नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्यासाठी कोणत्या राजकारण्याचे म्हणणे आहे ते येथे पहा.
-
सुप्रसिद्ध हास्य कलाकार राजू श्रीवास्तव जी का एक विशिष्ट अंदाज था, उन्होंने अपनी अद्भुत प्रतिभा से सभी को प्रभावित किया। उनका निधन कला जगत के लिए एक बड़ी क्षति है। मैं उनके परिजनों व प्रशंसकों के प्रति संवेदना व्यक्त करता हूँ। ईश्वर उन्हें यह दुःख सहने की शक्ति दें। ॐ शांति शांति
— Amit Shah (@AmitShah) September 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">सुप्रसिद्ध हास्य कलाकार राजू श्रीवास्तव जी का एक विशिष्ट अंदाज था, उन्होंने अपनी अद्भुत प्रतिभा से सभी को प्रभावित किया। उनका निधन कला जगत के लिए एक बड़ी क्षति है। मैं उनके परिजनों व प्रशंसकों के प्रति संवेदना व्यक्त करता हूँ। ईश्वर उन्हें यह दुःख सहने की शक्ति दें। ॐ शांति शांति
— Amit Shah (@AmitShah) September 21, 2022सुप्रसिद्ध हास्य कलाकार राजू श्रीवास्तव जी का एक विशिष्ट अंदाज था, उन्होंने अपनी अद्भुत प्रतिभा से सभी को प्रभावित किया। उनका निधन कला जगत के लिए एक बड़ी क्षति है। मैं उनके परिजनों व प्रशंसकों के प्रति संवेदना व्यक्त करता हूँ। ईश्वर उन्हें यह दुःख सहने की शक्ति दें। ॐ शांति शांति
— Amit Shah (@AmitShah) September 21, 2022
गृहमंत्री अमित शाह यांना शोक - प्रख्यात कॉमेडियन राजू श्रीवास्तव जी यांची एक विशिष्ट शैली होती. त्यांनी आपल्या अप्रतिम प्रतिभेने सर्वांना प्रभावित केले. त्यांच्या निधनाने कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे. मी त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती शांती, अशा शब्दात ट्विटद्वारे अमित शाह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला - राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. एक कुशल कलाकार असण्यासोबतच ते अतिशय जिंदादिल व्यक्ती देखील होते. सामाजिक क्षेत्रातही ते सक्रिय होते. मी त्यांच्या शोकमग्न कुटुंबीय आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना व्यक्त करतो.
केजरीवाल यांनीही शोक व्यक्त केला - प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो. या दु:खाच्या काळात त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या सर्व चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.