नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग परिसरात बुधवारी संध्याकाळी एका महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ( Dead Body Of woman In Suitcase ) महिलेची ओळख पटलेली नाही. रिंगरोडजवळील एका नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. हा नाला प्रत्यक्षात नजफगढ नाल्याचा एक भाग असून त्याच्या बाजूला एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला.
मृतदेहाची स्थिती पाहून तो आठ ते दहा दिवसांचा असावा, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. राजौरी गार्डनकडून पंजाबी बागकडे जाणाऱ्या रिंगरोडजवळ एक सुटकेस पडल्याची माहिती एका वाटसरूने पीसीआरला दिली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंजाबी बाग पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सुटकेसमधून मृतदेह बाहेर काढला. गुन्हे शाखेचे पोलिस तपास करत आहेत.
मृतदेहाची अवस्था अत्यंत बिकट होती, त्यामुळे हा मृतदेह 8 ते 10 दिवसांपूर्वीचा असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. या महिलेची ओळख पटवून देण्याचे प्राथमिक आव्हान पोलिसांसमोर आहे. मात्र, सुटकेसमध्ये दुसरे काहीही आढळले नाही. महिलेची इतरत्र हत्या करून मृतदेह टाकण्यासाठी नजफगढ नाल्याच्या काठावर फेकण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.