नवी दिल्ली - दिल्लीत लगातार वाढत असलेल्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे येथील दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नव्या मार्गदर्शक सुचना ( DDMA New Guidelines ) देण्यात आल्या आहेत. दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये बंद ( ddma private office closed ) करण्यात आले आहेत तर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ( work from home in delhi ) देण्यात आले आहे.
रेस्टोरेन्ट आणि बार देखील बंद -
दिल्लीत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता डीडीएमएच्या नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहे. त्यामध्ये त्यांनी संंपूर्ण खाजगी कार्यालये बंद करण्याचे म्हटले आहे तर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच दिल्लीतील रेस्टारन्ट आणि बार हे देखील बंद करण्यात आले आहेत. यामध्ये फक्त पार्सलची सुविधा उपलब्ध असणार आहे.
खाजगी कार्यालये पूर्णपणे बंद -
यापूर्वी दिल्ली डीडीएमए ने लागू केलेल्या आदेशात असे म्हटले होते की, दिल्लीतील सर्व कार्यालये ही 50 टक्के क्षमतेने सुरू होती. आता त्यांना पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा - Corona Update : भारतात कोरोना रुग्णांमधे घट, 1.68 लाख नवीन रुग्णांची नोंद