ETV Bharat / bharat

ऑक्सिजन सिलेंडर अभावी तोंडावाटे कृत्रिम श्वास... मुलीने आईचे वाचविले प्राण!

शनिवारी एक महिला आईला घेऊन वैद्यकीय रुग्णालयात पोहोचली. मात्र, तिथे रुग्णासाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध नव्हता. त्यावेळी चिंताग्रस्त महिलेने आईचे प्राण वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यास सुरुवात केली.

मुलीने आईचे वाचविले प्राण
मुलीने आईचे वाचविले प्राण
author img

By

Published : May 3, 2021, 9:40 PM IST

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना बहारिच येथील ऑटोनमस स्टेट मेडिकल कॉलेजमधील स्थिती नियंत्रणाबाहेर आहे. आपत्कालीन स्थिती येणाऱ्या रुग्णांनादेखील ऑक्सिजन मिळत नाही.

शनिवारी एक महिला आईला घेऊन वैद्यकीय रुग्णालयात पोहोचली. मात्र, तिथे रुग्णासाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध नव्हता. त्यावेळी चिंताग्रस्त महिलेने आईचे प्राण वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यास सुरुवात केली.

ऑक्सिजन सिलेंडर अभावी तोंडावाटे कृत्रिम श्वास

हेही वाचा-ऑक्सिजनच्या तुटवड्याने दिल्लीमधील रुग्णांची दमछाक...न्यायालयाची केजरीवाल सरकारला नोटीस

महिलेने आईला तोंडावाटे कृत्रिम श्वास देऊन आईचे प्राण कसेबसे वाचविले. मुलीने आईचे प्राण वाचविल्याचे पाहत रुग्णालयात अनेकांनी जल्लोष केला. या घटनेची कोणीतरी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा-18 ते 44 वयोगटातील लसीकरणात गुजरातला झुकते माप; जयराम रमेश यांचा आरोप

महिलेची तब्येत स्थिर

व्हिडिओ व्हायर झाल्यानंतर रुग्णालयांमधील डॉक्टरांची चिंता वाढली आहे. त्यांनी घाईने महिला रुग्णाला आपत्कालीन वॉर्ड दाखल केले आहे. सध्या, महिला रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. महिलेवर खासगी नर्सिंग होममध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली आदी राज्यातंही ऑक्सिजन अभावी कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.