ETV Bharat / bharat

Supreme Court : पित्यासोबत नाते ठेवले नाही तर मुलीला शिक्षणाकरिता पैसे मागण्याचा अधिकार नाही- सर्वोच्च न्यायालय - सर्वोच्च न्यायालय मुलगी पोटगी निकाल

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल ( Supreme court on divorce case ) आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर घटस्फोटाशी संबंधित एका खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यामध्ये न्यायालयाने कोणताही तोडगा न काढता या जोडप्याला घटस्फोट मंजूर ( daughter cannot demand money for edu )  केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पत्नीसाठी पतीला दरमहा 8,000 रुपये आणि दाव्यांच्या पूर्ण आणि अंतिम निकालासाठी 10 लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय
author img

By

Published : Mar 19, 2022, 7:36 PM IST

नवी दिल्ली - सज्ञान मुलगी जर पित्यासोबत नातेसंबंध ठेवत नसेल तर तिला पैसे मागण्याचा अधिकार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. याच खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पतीला एकरकमी 10 लाख रुपये आणि हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.

घटस्फोटाच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जोडप्याच्या 20 वर्षांच्या मुलीच्या लग्न आणि शिक्षणावरील खर्चाबाबतची भूमिकाही स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले की, मुलीला तिच्या वडिलांसोबत नातेसंबंध ठेवायचा आहे की नाही याचा अधिकार आहे. परंतु जर तिचे तिच्या वडिलांशी कोणतेही नाते नसेल, तर तिला त्यांच्याकडून शिक्षणासाठी खर्चाची मागणी करण्याचा अधिकार नाही (मुलगी शिक्षणासाठी पैशाची मागणी करू शकत नाही). पित्याला स्वेच्छेने आपल्या मुलीला मेंटेनन्स द्यायचा ( court grants divorce to couple ) असेल तर ते देऊ शकतात.

हेही वाचा-Eknath Khadase On Chandrakant Patil : एकनाथ खडसे यांची चंद्रकांत पाटील व रावसाहेब दानवे यांच्यावर टीका

पतीला 10 लाख रुपये जमा करण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल ( Supreme court on divorce case ) आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर घटस्फोटाशी संबंधित एका खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यामध्ये न्यायालयाने कोणताही तोडगा न काढता या जोडप्याला घटस्फोट मंजूर (daughter cannot demand money for edu) केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पत्नीसाठी पतीला दरमहा 8,000 रुपये आणि दाव्यांच्या पूर्ण आणि अंतिम निकालासाठी 10 लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा-Pune Car Factory Fire : कासुर्डीतील कार केअर प्रोडक्ट्स कंपनीच्या उत्पादन युनिटमध्ये भीषण आग

पित्याला आधार द्यायचा असेल तर मुलीला देऊ शकतात पोटगी

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाचा प्रश्न आहे. तिच्या दृष्टिकोनातून असे दिसते, की तिला अर्जदारासोबत (वडील) कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. तिचे वय 20 वर्षे आहे. अशा परिस्थितीत, तिला स्वतःचा मार्ग निवडण्याचा अधिकार आहे. परंतु ती तिच्या वडिलांकडून शिक्षणाची मागणी करू शकत नाही. अशा प्रकारे, आम्ही मानतो की मुलीला वडिलांकडून कोणत्याही रकमेचा हक्क मिळणार नाही. परंतु प्रतिवादीला कायमस्वरूपी पोटगी म्हणून किती रक्कम द्यायची हे निश्चित करणे आवश्यक आहे. जर मुलीच्या पित्याला तिला आधार द्यायचा असेल तर ते पोटगी देऊ शकतात.

हेही वाचा-Heat Wave In Maharashtra : नागरिकांनो काळजी घ्या, पुढील 2 दिवस महाराष्ट्रातील तापमान वाढणार

2002 पासून दोघे राहतात वेगळे-

तक्रारदार महिलेचा 1998 मध्ये लग्न केले होते आणि 2002 पासून दोघे वेगळे राहू लागले. पत्नीने पतीसोबत राहण्यास नकार दिला. पतीवर मारहाण, छळ आणि घराबाहेर काढल्याचा महिलेचा आरोप आहे. 2001 मध्ये जन्मलेली त्यांची मुलगी तिच्या जन्मापासूनच आईसोबत राहत असून आई-मुलीचा खर्च तिचे मामा करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.