ETV Bharat / bharat

दत्तात्रय होसबळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे सहकार्यवाह - Dattatreya Hosabale

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहपदी दत्ताजी होसबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भैयाजी जोशी यांच्याकडे नवी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

दत्ताजी होसबळे
दत्ताजी होसबळे
author img

By

Published : Mar 20, 2021, 1:40 PM IST

Updated : Mar 20, 2021, 2:48 PM IST

बंगळुरू - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहपदी दत्ताजी होसबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत त्यांच्या नाववर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता भैय्याजी जोशी यांची जागा दत्तात्रेय होसाबाळे घेतील. 2009 पासून सरकार्यवाह पदाची धुरा सांभाळणारे भैय्याजी जोशी हेच या पदावर कायम राहणार अशी शक्यता होती. मात्र तब्बल 12 वर्षांनी या पदावर दत्तात्रय होसबळे यांची निवड झाली आहे. तर भैयाजी जोशी यांच्याकडे नवी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. तर दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. प्रथमच ही सभा कोरोनामुळे संघ मुख्यालयी म्हणजे नागपुरात न होता बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली आहे. सरकार्यवाहचा कार्यकाळ 3 वर्षाचा आहे.

कोण आहेत दत्तात्रय होसबळे?

  • दत्तात्रेय होसबळे यांना आरएसएसमध्ये दत्ताजी या नावाने लोकप्रिय आहेत. त्यांचा जन्म 1 डिसेंबर 1954 रोजी कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील सोराबा तालुक्यातील होसाबाळ या छोट्याशा गावात झाला आहे.
  • होसबळे यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी संबंधित आहेत. दत्तात्रय होसबळे हे विद्यार्थी दशेपासून संघाच्या विविध उपक्रमात सहभागी होत असायचे. 1978 साली त्यांनी बंगलोर विश्व विद्यालयातून इंग्रजी भाषेत एम ए केलेलं आहे. त्याचा संघातील प्रावस हा 41 वर्षांचा झालेला आहे.
  • 1978 पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राजकीय जीवनास सुरुवात केली. ते दोन दशके एबीव्हीपीचे संघटन महामंत्री होते. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी संघात सह सरकार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
  • दत्तात्रय होसबळे हे 65 वर्षीय आहेत.
  • दत्तात्रय होसबळे हे मूळ कर्नाटकमधील असून मातृभाषा कन्नड आहे.
  • संस्कृतसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.
  • दत्तात्रय होसबळे हे इंडियन पॉलिसी फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त आहेत
  • कन्नड भाषेतील असिमा नावाच्या मासिकाचे ते संस्थापक संपादक आहेत.
  • त्यांनी एकदा तुरुंगवासही भोगला आहे. मिसा कायद्या अंतर्गत जेलमध्ये होते.

आरएसएसमध्ये सरसंघचालक हे सर्वात मोठे स्थान आहे. परंतु एक प्रकारे ते मार्गदर्शकांचे पद आहे. सरकार्यावाह हे संस्थेच्या दैनंदिन कामांसाठी जबाबदार असतात. हे पद सरचिटणीस समतुल्य आहे. सरसंघचालक स्वतःच त्याचा वारसदार निवडतात. सरसंघचालकांचा निर्णय संघटनेत अंतिम मानला जातो. सध्या सरसंघचालक मोहन भागवत आहेत.

अखिल भारतीय प्रतिनिधी असेंब्लीची (एबीपीएस) कार्ये संघात अत्यंत महत्त्वाची असतात. ही युनियनमधील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. यावेळी त्याची दोन दिवसीय वार्षिक बैठक बेंगळुरूमध्ये होत आहे. आज या बैठकीत सरकार्यवाह यांची निवड झाली आहे. सुमारे 450 प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.

हेही वाचा - रिप्ड जीन्स प्रकरण : 'OMG यांचे तर गुडघे दिसतायंत, संघाच्या नेत्यांचा हाफ पॅण्टमधील फोटो शेअर प्रियांका गांधींची टीका

Last Updated : Mar 20, 2021, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.